हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Account : सध्याच्या काळात बँकेचे खाते नाही अशी व्यक्ती कवचितच आढळून येईल. आजकाल अनेक सरकारी योजनांचा लाभही थेट बँकेच्या खात्यांमध्ये जमा केला जातो आहे. त्यामुळे आपल्याकडे बँकेचे खाते असणे खूप महत्वाचे आहे. याबरोबरच बँकांकडूनही ग्राहकांना खाते उघडण्यासाठी अनेक ऑफर्स दिल्या जातात. मात्र आपल्याला जास्तीत जास्त किती खाती उघडता येतील याचा कधी विचार केला आहे का ??? आज आपण किती बँक खाती उघडता येतील याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत…
आजकाल बहुतेक लोकांकडे 3 ते 4 बँकांची बचत खाती असतात. हे लक्षात घ्या कि, भारतात बँक खाते उघडण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही. RBI ही भारताची मध्यवर्ती बँक आहे. जिच्याकडून इतर बँकांसाठीचे नियम तयार केले जातात. RBI ने बँक खात्यांच्या संख्येबाबत कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही. त्यामुळे आपल्या हव्या त्या बँकेत हवी तितकी बँक खाती उघडता येतील. Bank Account
एकापेक्षा जास्त खाती असतील तर ती कशी मॅनेज करावी ???
आपल्याला अनेक बँकांमध्ये खाते उघडता येतील. त्याबरोबरच ते अगदी सहजपणे मॅनेजही करता येतील. यासाठी या खात्यातून व्यवहार चालू ठेवावे लागतील. तसेच जर बराच काळ आपले खाते ऍक्टिव्ह नसेल तर बँकेकडून असे खाते बंद केले जाऊ शकते. म्हणूनच आपली सर्व बँक खाती वापरात असावी. मात्र, एकापेक्षा जास्त बँक खाती उघडताना अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. Bank Account
मिनिमम बॅलन्स ठेवावा लागेल
सध्या जवळपास सर्वच बँकांमध्ये बचत खात्यासाठी मिनिमम बॅलन्स राखणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्यामुळे आपल्या बँक खात्यात नेहमी किमान रक्कम ठेवावी लागेल. असे न केल्यास बँक आपल्या खात्यातून शुल्क कापून घेईल. तसेच जर शुल्क कट करूनही मिनिमम बॅलन्स राखला नाही तर आपले बँक खाते निगेटिव्ह होईल. अशा परिस्थितीत मिनिमम बॅलन्स ठेवण्याची काळजी घ्यावी लागेल. Bank Account
एकापेक्षा जास्त खाती असल्याचा बँकेला होतो फायदा
एकापेक्षा जास्त खात्यांमुळे बँकांना खूप फायदा होतो. मात्र मेसेज पाठवण्यासाठी प्रत्येक बँकेकडून दर महिन्याला एक रक्कम आकारली जाते. तसेच हे बँक खाते सांभाळण्यासाठी काही खर्चही भरावा लागतो. त्याचबरोबर बँकेच्या डेबिट कार्डसाठी वार्षिक शुल्कही भरावे लागते. अशा परिस्थितीत, आपल्याला आवश्यक असेल तितकीच बँक खाती उघडली पाहिजेत. Bank Account
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://sbi.co.in/web/personal-banking/accounts/saving-account/savings-bank-account
हे पण वाचा :
FD Rates : खासगी क्षेत्रातील ‘या’ बँकेने फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात केली वाढ, असे असतील नवीन दर
Multibagger Stock : गेल्या काही वर्षांत 200% जास्त रिटर्न देऊन ‘या’ शेअर्सने गुंतवणूदारांना केले मालामाल !!!
Canara Bank ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळणार 7.5% व्याज
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ, नवीन दर पहा
PNB च्या ‘या’ स्पेशल ऑफर अंर्तगत ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळणार 6.60% रिटर्न !!!