मुंबई | काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीतून भाजपामध्ये गेलेले काही आमदार आहेत, त्यांना थांबविण्यासाठी व आपल्याकडिल आमदार फूटू नयेत. यासाठी भाजपा ऑपरेशन लोटसच्या अफवा पसरवत असल्याचे राष्ट्रवादीचे नेते व अलसंख्याक नवाब मलिक यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रवादीचे सर्वाेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी आजारपणानंतर सदिच्छा भेट दिली. काल त्यांनी केवळ सदिच्छा भेट असल्याचे सांगितले तर आज सत्ता परिवर्तन होणार असे सांगितले. यावर नवाब मलिक म्हणाले, देवेंद्र फडणवीस कोरोनात नाही तर कोरोनानतंर सत्ता परिवर्तन होईल. केवळ तारीख पे तारीख देवेद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील देत आले आहेत.
भाजपचे नेते सत्ता येणार असे वारंवार सांगत तारीख पे तारीख देत आहेत. पण एकही भविष्यवाणी सत्य होत नसल्याने ते हताश झाले आहेत. त्यामुळेच महाविकास आघाडी सरकार विरोधात एककलमी कार्यक्रम हे नेते राबवत असल्याची टीका अल्पसंख्याक मंत्री @nawabmalikncp यांनी केली आहे. pic.twitter.com/cTwFDyqJWB
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) June 2, 2021
भाजपाच्या नेत्यांनी पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर आॅपरेशन लोटस करणार असल्याचे सांगितले होते. आता पुन्हा ते सत्ता परिवर्तन करणार असल्याचे सांगत आहेत. जोपर्यंत महाराष्ट्रात तीन पक्ष एकत्रितपणे आहोत, तोपर्यंत ऑपरेशन लोटस होणार नाही. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले आहे. महाविकास आघाडी 5 वर्षे नव्हे तर 25 वर्षे एकत्रित सत्ता राखेल.