हॅलो महाराष्ट्र | परभणी प्रतिनिधी
परभणी शहरापासुन काही अंतरावर लातूरहून नागपुरकडे जाणाऱ्या धावत्या ट्रॅडल्सला आग लागल्याची घटना शनिवारी रात्री घडली आहे . विशेष म्हणजे गाडीला आग लागल्याचे चालकाला समजलेच नाही. सुदैवाने ट्रॅव्हल्स मधील चाळीस प्रवाशी बालबाल बचावले आहेत .
लातूरहून परभणी मार्गे नागपुरला जाणारी एम . एच . 40 वाय 9135 क्रमांकाची ट्रॅव्हल्स प्रवाशी घेऊन शनिवार 9 एप्रिल रोजी लातुरहुन निघाली होती. दरम्यान परळी ते गंगाखेड दरम्यान गाडी नादुरुस्त असल्याचे प्रवाशांना जाणवले होते . चालकाने टायरची हवा तपासुन गाडी पुढील प्रवासासाठी परभणीकडे निघाली असता ब्राम्हणगाव शिवारात ट्रॅव्हल्सच्या बॅटऱ्यांना अचानक आग लागली .
ट्रॅव्हल्सला आग लागली असल्याची माहीती मात्र चालकाला नव्हती . पाठीमागुन येणाऱ्या चारचाकी वाहनाच्या चालकाने बसला आग लागली असल्याचे सांगितल्यानंतर ट्रॅव्हल्स मधील सर्व प्रवाशी खाली उत्तरविण्यात आले . यावेळी प्रवाशी घाबरल्याने धावपळ झाली .
या घटनेत एक प्रवाशी किरकोळ जखमी झाला आहे .दरम्यान पो . राहिरे , पोलिस कर्मचारी लिंबाळकर हे पेट्रोलिंगसाठी जात असताना ट्रॅव्हल्सला आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले . याबाबतची माहिती या पोलीस पथकाने तात्काळ कंट्रोल रुमला दिली आणि जखमीला परभणी येथील येथील रुग्णालयात पाठविले होते . दरम्यान अग्निशामक बंबाने आग विझवेपर्यंत ट्रॅव्हल्स जळून खाक झाली होती .