जे जे राजकारण करतायत ते कोरोनाने मेले पाहिजेत; रुपाली ठोंबरे यांची संतप्त प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात होत असून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच राज्यात बेड, व्हेंटिलेटर आणि रेमडेसिवीर यांचा तुटवडा जाणवत असून याच मुद्द्यांवरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात राजकारण रंगल आहे. यावरून मनसे नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे राज्यातील सर्व राजकीय पक्षांना खडेबोल सुनावले आहेत. राजकारणी माणूस किती नीच आणि घाणेरडा असतो हे लोकांना समजलं पाहिजे आणि मला आज लाज वाटते की मी राजकारणात या लोकांसोबत काम करते.असे रुपाली पाटील यांनी म्हंटल.

देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं दिल्लीतील वजन वापरून महाराष्ट्राला रेमडेसिवीर मिळवून दिले असते तर राज्याने पुन्हा एकदा त्यांना मुख्यमंत्री पदावर बसवलं असत अस त्या म्हणाल्या. पण तुम्हाला सत्तेसाठी पहाटे अजितदादा चालतात पण महाराष्ट्राला रेमडेसिवीर देताना तुम्ही राजकारण करता असही त्या म्हणाल्या.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/165300825473375/

माणूस मरत असताना सत्ताधारी आणि विरोधक घाणेरड्या पध्दतीने राजकारण करत आहेत. जे जे राजकारण करतायत ते कोरोनाने मेले पाहिजेत अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. ज्या ज्या लोकांनी मुद्दाम साठेबाजार केला आहे, सर्वसामान्य लोकांना रेमडेसिवीर मिळवून देत नाहीत बेड देत नाही ते सगळे मेले पाहिजेत असे त्या म्हणाल्या.

सध्याच्या कोरोना परिस्थितीला राज्य आणि केंद्र सरकार दोघेही जबाबदार आहेत असा आरोप त्यांनीं केला. आत्तापर्यंत सर्वांना लस मिळायला हवी होती. तुम्ही लस तर देऊ शकला नाही पण रेमडीसीवीर सुद्धा तुम्ही देऊ शकत नाही?? तुम्हि सांगता की महाराष्ट्राला रेमडीसीवीर देऊ नका त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला माझी विनंती आहे की जो जो सत्तेवर त्याला दिसलं की चोपा अशा कडक शब्दात रुपाली पाटील यांनी संताप व्यक्त केला.

Leave a Comment