हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन ! एकनाथ शिंदे यांनी तब्बल 40 हुन अधिक आमदारांना सोबत बंडखोरी केली आणि शिवसेनेला धक्का दिला. यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारही धोक्यात आले आहे. येवडच नव्हे तर आमचा गट हीच खरी शिवसेना असा दावा करत शिंदे गटाने पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना हादरा दिला आहे. एकूण सर्व घडामोडींवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे अस आवाहन केले आहे. त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
काही महिन्यांपूर्वीच मनसेतून राष्ट्रवादी मध्ये गेलेल्या रुपाली पाटील म्हणाल्या, हीच ती वेळ आहे, बाळासाहेब ठाकरे यांच्या दोन्ही लेकरांनी एकत्र येण्याची. यावेळी त्यांनी रामायणातील उदाहरण दिले। वनवासात जाण्याची वेळ रामावर आल्यानंतर लक्ष्मण सर्वकाही सोडून त्याच्यासोबत गेला होता, असं त्या म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या, आज महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा आणि मुंबईला केंद्रशासित करण्याचा घाट सुरू आहे. आज जर बाळासाहेब ठाकरे जिवंत असते, तर त्यांनी हे होऊ दिलं नसतं. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याची हीच वेळ आहे. मराठी माणसासाठी, त्याचं अस्तित्व टिकवण्यासाठी हे गरजेचं आहे असं रूपाली पाटील यांनी म्हटलं .