मॉस्को । रशियन प्रवासी विमान बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली आहे. या विमानात कमीतकमी 13 प्रवासी होते. टॉम्स्कच्या सायबेरियन प्रदेशावरील उड्डाणा दरम्यान शुक्रवारी विमानात कमीतकमी 13 लोकं घेऊन जाणारे एक रशियन AN -28 प्रवासी विमान शुक्रवारी बेपत्ता झाले, अशी माहिती स्थानिक वृत्तसंस्थांनी
एव्हिएशनफॅक्स आणि TASS वृत्तसंस्थांनी सांगितले की, त्यात 13 लोकं होती, मात्र IRA नोव्होस्ती एजन्सीने सांगितले की,” त्यात 17 लोकं होती.”
Russian plane goes missing in Siberia with at least 13 people on board, reports AFP
— ANI (@ANI) July 16, 2021
या महिन्याच्या सुरुवातीसचा 6 जुलै रोजी, एका रशियन विमानाचा संपर्क तुटला. त्या विमानात 29 लोकं होती. रशियामधील पेट्रोपाव्लोसहून पलानाकडे जाण्यासाठी विमान क्रमांक A -26 जात असताना त्याचा संपर्क तुटला. रशियन वृत्तसंस्था TASS च्या माहितीनुसार विमान उतरण्याच्या वेळी विमानाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. स्थानिक परिवहन मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार हे विमानही रडारवरून गायब झाले.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा