मॉस्को । रशियाच्या नोव्होसिबिर्स्क स्टेट युनिव्हर्सिटीच्या प्रयोगशाळेचे प्रमुख आणि रशियन अकॅडमी ऑफ सायन्सेस (RAS) चे संबंधित सदस्य सर्गेई नेत्सोव्ह म्हणाले की,” रशियाच्या Sputnik-V सह व्हायरल वेक्टर आणि mRNA लस ही कोरोनाच्या नवीन स्ट्रेन डेल्टाविरूद्ध प्रभावी आहेत. सर्गेई नेत्सोव्ह म्हणाले कि,”यूके, अमेरिका आणि इतर देशांच्या आकडेवारीनुसार, Sputnik-V सह आमची mRNA आणि वेक्टर लस डेल्टावर प्रभावी आहेत. या लसी कोरोनाविरूद्ध 95% संरक्षण आणि डेल्टा स्ट्रेन्सपासून 90% संरक्षण देतात.” ते म्हणाले की,” यापूर्वी विकसित झालेल्या लसींचा वापर करणे आवश्यक आहे कारण त्या प्रभावी आहेत.”
Sputnik-V विकसित करणार्या मॉस्कोच्या गमालया संस्थेचे उपसंचालक डेनिस लोगुनोव्ह यांनी सांगितले की,”डिजिटल मेडिकल आणि लसीच्या नोंदींच्या आधारे डेल्टा व्हेरिएंटच्या कार्यक्षमतेचे आकडे मोजले गेले आहेत.” गमालया संस्थेचे संचालक अलेक्झांडर गंट्सबर्ग यांच्या मते जगातील देशांनी डेल्टा व्हेरिएंटच्या धोक्यांविषयी चेतावणी दिली आहे. सुमारे 14.4 कोटी लोकसंख्येच्या रशियाने देशात निर्मित चार लसी मंजूर केल्या आहेत आणि साथीच्या रोगाचा प्रारंभ झाल्यापासून सुमारे 55 लाख संसर्गाची प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
डेल्टा व्हेरिएंट म्हणजे कोरोनाची दुसरी धोकादायक लाट भारतात आली. कोविड -19 चा हा व्हेरिएंट भारतात पहिल्यांदा सापडला. भारतामध्ये यामुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग खूप वेगाने पसरतो. यासह, रुग्णांमध्ये कोरोनाची तीव्र लक्षणे दिसून येतात. सध्या ब्रिटन आणि इस्त्राईलमध्ये या बदलांमुळे कोरोनाची नवीन प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायलमध्ये कोरोनाची 90 टक्के प्रकरणे या व्हेरिएंटमुळे आली आहेत. ही परिस्थिती तेव्हा आली आहे कि जेव्हा तेथील 50 टक्के लोकांना लस दिली गेली.
Sputnik-V ला 67 देशांनी मान्यता दिली आहे
विशेष म्हणजे रशिया आपल्या नागरिकांना Sputnik-V लसीचा डोस देत आहे. ही लस देखील अॅस्ट्रॅजेनेकाच्या लसीप्रमाणे दोन डोसांची लस आहे. वेगवेगळ्या देशांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात कोरोना विषाणूविरूद्ध ही लस प्रभावी असल्याचे दिसून आले असले तरी रशियाची Sputnik-V लस अद्याप WHO च्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. Sputnik-V ला भारतासह जगातील 67 देशांनी मान्यता दिली आहे. कोरोना विषाणूच्या दोन लसी बनवल्यानंतरही रशिया हा जगातील सर्वात कमी लसींकरण झालेला देश आहे. येथे केवळ 13 टक्के लोकांनाच कोरोना विषाणूच्या लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. तर इतर युरोपियन देशांमध्ये ही संख्या सरासरी 30 टक्क्यांहून अधिक आहे. लसीकरणाच्या संथ गतीबद्दल रशियावर टीकाही होत आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा