नवी दिल्ली | जगातली सर्वात पहिली करोना लस असण्याचा दावा करणारी स्पुटनिक- वी ही लस आता भारतात पण उपलब्ध होणार आहे. ही लस करोना विरोधात 91% प्रभावी असल्याचा दावा करत आहे. भारत सरकारच्या लसी संधर्भात नेमण्यात आलेल्या तज्ञांनी लासिला इमर्जन्सी साठी मान्यता दिली आहे. यानंतर या लसीची किंमत किती असेल तबाबतही चर्चा होताना दिसून येत आहे.
भारतामध्ये लसीकरणाचे सर्व नियोजन हे सरकारच्या नियंत्रणात आहे. त्यामुळे सरकार कंपण्यांसोबत वाटाघाटी करून लसीकरणाची किंमत ठरवते. स्पुटनिक- वी वाल्या लसीच्या कंपनीकडून सांगण्यात आले होते की जगभरासठी लसीची किंमत ही सारखीच असेल. जगभरासाठी ही किंमत 730 रुपये इतकी असणार आहे. पण अजून भारत सरकार आणि कंपनी यांच्यामध्ये चर्चा झाली नाही. लवकरच ही चर्चा झाल्यानंतर लसीची किंमत कळून येईल.
लवकरच ही लस भारतात आयात करून त्याचे तयार करणे हे डॉ रेड्डीज आणि पनिशिया बायोटेक यांचे उत्पादन करतील. ही लस केवळ 2 ते 8 डिग्री मध्येच ठेवता येऊ शकते. 21 दिवसाच्या अंतराने या लसीच्या दोन डोस दिल्यानंतर पर्याप्त सरंक्षण माणसाला मिळते. आत्तापर्यंत जगभरातील 60 देशांनी या लसिला मान्यता दिली आहे.