रशिया भारताला देणार हे ‘ब्रह्मास्त्र’; चीननं केला होता विरोध

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मॉस्को । लडाख सीमेवर भारत आणि चीन या दोन देशामध्ये सीमावादावरून तणावाचं वातावरण आहे. अशा वेळी भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे सध्या रशियाच्या दौऱ्यावर आहेत. रशियाकडून अत्याधुनिक S-400 एअर डिफेन्स मिसाइल सिस्टम भारताला मिळवण्याच्या दृष्टीनं राजनाथ सिंह यांचा हा दौरा महत्वाचा आहे. दरम्यान, रशियाने S-400 एअर डिफेन्स मिसाइल सिस्टम भारताला देण्याचा निर्णय घेतला आहे. रशियाचे उपपंतप्रधान युरी इवानोव्हिक यांनी हे ब्रह्मास्त्र लवकरच भारताला देण्याचं आश्वासन दिलं आहे.

भारत आणि रशियादरम्यान विशेष सहकार्य आहे. तसंच भारतासोबतचा करार लवकरच पूर्ण करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं असल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी बैठकीनंतर दिली. “रशियाच्या उपपंतप्रधानांशी माझी चर्चा झाली आहे आणि बैठकीतही सकारात्मक चर्चा झाली. करोनासारख्या संकटानंतरही द्विपक्षीय संबंध दृढच आहेत. जे करार करण्यात आले आहेत, ते कायम ठेवण्यात येतील. तसंच बऱ्याच बाबींमध्ये ही कामं लवकरच पूर्ण केली जातील,” असं सांगितलं असल्याची माहिती त्यांनी दिली. ‘हिंदुस्तान टाइम्स’नं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

भारताला S-400 एअर डिफेन्स मिसाइल सिस्टम देऊ नये म्ह्णून चीनची रशियाला विनंती
पीपल्स डेलीनं रशियानं भारताला शस्त्रास्त्रे देऊ नये अस मत व्यक्त केलं होतं. “तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या संवेदनशील काळात रशियाने भारताला शस्त्रास्त्रं देऊ नये. आशियातील हे दोन्ही शक्तीशाली देश रशियाचे जवळचे रणनितीक भागीदार आहेत” असे पीपल्स डेली या वर्तमानपत्रानं फेसबुकवरील ‘सोसायटी फॉर ओरियंटल स्टडीज ऑफ रशिया’ या ग्रुपवर लिहिलं होतं. पीपल्स डेली हे चिनी सरकारचे मुखपत्र आहे. रशियाकडून आवश्यक युद्धसाहित्याची खरेदी करुन आपली लष्करी क्षमता अधिक बळकट करण्याचा भारताचा प्रयत्न सुरु असताना चिनी सरकारच्या मुखपत्रातून ही मागणी करण्यात आली होती. आपात्कालिन परिस्थितीत खरेदी करण्यासाठी केंद्राने ५०० कोटींचा निधी मंजूर केला आहे. “लडाखमधील वादाच्या पार्श्वभूमीवर भारताला तात्काळ ३० फायटर विमाने खरेदी करायची आहेत. यामध्ये मिग २९ आणि सुखोई ३० विमानांचा समावेश आहे” असे पीपील्स डेलीने फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment