राज्यात पुन्हा लॉकडाउनची शक्यता?? सामनातून सूचक इशारा??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून चिंता वाढली आहे. काही जिल्ह्यामध्ये निर्बंध घालून देखील कोरोना रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. याच पार्श्वभूमीवर सामना अग्रलेखातुन लॉक डाउन चे संकेत देण्यात आले आहेत.  लग्न, सार्वजनिक कार्यक्रम, सभा-संमेलने या ठिकाणच्या गर्दीवर नियंत्रण हवेच, मास्कची सक्ती तर असायलाच हवी. नियम मोडणाऱ्यांवर कठोर शासन होणे गरजेचे आहे, असं मत आजच्या सामना अग्रलेखातून व्यक्त करण्यात आलंय. तसंच लोकांनी जर नियम पाळले नाहीत, तर कठोर निर्बंध लावाले लागतील, असं संकेत सामनाच्या संपादकीयमधून  दिले आहेत.

मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे पुन्हा लॉक डाऊनच्या दिशेने आपण निघालो आहोत काय? अशी भीती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वारंवार स्पष्ट केले आहे, पुन्हा लॉक डाऊन नको असेल तर नियमांचे काटेकोर पालन करा! पण लोक बेपर्वा होऊन गर्दी करीत आहेत, मास्क न लावता वावरत आहेत, उत्सव साजरे करीत आहेत.

राजकीय मेळावे, लग्न समारंभ तसेच बहुतेक सर्वत्र लोक मास्क लावत नाहीत की सुरक्षित अंतर ठेवताना दिसत नाहीत. लोक बेपर्वा का आहेत? परिस्थिती अशीच राहिली तर कोरोनाची लाट नव्हे, तर लाटा येतील असा इशारा कोरोनासंदर्भातील राज्य कृती दलाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी दिला आहे. निदान डॉक्टरांचे तरी ऐका, अशी विनवणी सामनातून करण्यात आली आहे.

नियमांच्या पायमल्लीमुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा पुन्हा वाढू लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गर्दीत विदर्भयात्रा सुरू केली. सांगलीतही मिरवणूक निघाली. आता जयंतराव कोरोनाग्रस्त होऊन तळमळत आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्या प्रेमातही कोरोना पडला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अमिताभ बच्चन, अक्षय कुमारविरोधात ‘शूटिंग रोको’ आंदोलन करण्याची घोषणा करताच कोरोनाने त्यांच्या कार्यालयात प्रवेश केला व नाना यांना विलगीकरणात जावे लागले. एकनाथ खडसे यांना सलग तिसऱ्यांदा कोरोना झाला आहे. हे जरा विचित्रच आहे.

अमरावती, यवतमाळ, अकोल्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे तेथे सध्या तरी जमावबंदी लागू केली, पण काही जिल्ह्यांत पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल असे वातावरण आहे. सरकारने एकदा निर्णय घेतला की, त्याबाबत सारासार विचार न करता विरोधकांनी फक्त थयथयाट करायचा, हे लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बरे नाही. देवळे उघडली, लोकल ट्रेन्स सुरू झाल्या, बाजार उघडले; पण लोक नियमांचे पालन करायला तयार नाहीत, हे कसे चालेल? अस म्हणत शिवसेनेने विरोधकांवर निशाणा साधला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment