बर्फ फोडण्याचे दांडके डोक्यात घालून वेटरने केला गॅरेजमधील कामगाराचा खून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

पाण्याची मोटार बंद करण्याच्या किरकोळ कारणावरून वेटरने बर्फ फोडण्याचे लाकडी दांडके गॅरेजमधील कामगाराच्या डोक्यात घालून त्याचा खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पाचवड फाटा येथे घडली. याबाबतची फिर्याद राहुल मोहन यादव वय 35 रा. कालेटेक याने ग्रामीण पोलिसात दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी वेटरला अटक केली आहे.

या मारहाणीत रवी अशोक यादव (रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. भैरवनाथ वर्क शॉप पाचवड फाटा) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर रामप्रसाद उर्फ रामु परमेश्‍वर गोस्वामी (रा. रामप्रसाद खेडा, उत्तर प्रदेश) या संशयितास पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी राहूल यादव याची पाचवड फाटा येथे भैरवनाथ अ‍ॅटो वर्क शॉप व सुरक्षा अ‍ॅटो ऑटोमोबाईल अशी दुकाने आहेत. त्याच्या दुकानात रवी यादव हा चार महिन्यापासून कामास असून दुकानात राहत असतो. शुक्रवारी रात्री फिर्यादी सुरक्षा ऑटोमोबाईल दुकान बंद करून भैरवनाथ शॉपकडे येत असताना रवी यादवला रामप्रसाद हा बर्फ फोडण्याच्या लाकडी दांडक्याने मारत असल्याचे दिसले. हे पाहून फिर्यादी घटनास्थळाकडे पळत येत असल्याचे पाहून रामप्रसाद तेथून पळून गेला.

त्यावेळी रामप्रसादने हातातील लाकडी दांडके तेथेच टाकून हॉटेल साईबालाजीमध्ये गेला. फिर्यादी रवी जवळ गेलो असता त्याच्या डोक्यातून व उजव्या बाजूच्या कानाच्या मागून रक्त येत होते. तसेच तो निपचित पडलेला होता आणि कोणतीच हालचाल करत नव्हता. त्यावेळी फिर्यादी व साईबालाजी हॉटेलचे मॅनेजर चैतन्य कांबळे, दिनेश भाटी यांच्या सहकार्याने कृष्णा हॉस्पीटल, कराड येथे उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी रवी मयत झाल्याचे सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी संशयित म्हणून रामू परमेश्‍वर गोस्वामी याना अटक केली आहे.

Leave a Comment