शबरीमालाला यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या व्हॅनचा भीषण अपघात; 8 जणांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

तिरुअनंतपुरम : वृत्तसंस्था – केरळ-तामिळनाडू सीमेजवळ शुक्रवारी रात्री एक भीषण अपघात (accident) झाला आहे. यामध्ये कुमिलीजवळ सबरीमाला यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या व्हॅनचा अपघात (accident) झाला आहे. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. व्हॅन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे समजत आहे. रात्री अकराच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

काय घडले नेमके?
हे सर्व शबरीमाला श्री धर्म संस्था मंदिरात भगवान अय्यप्पाचे दर्शन घेऊन परतत होते. कुमिली-कुंबम मार्गावर तामिळनाडूला पाणी वाहून नेणाऱ्या पहिल्या पेनस्टॉक पाईपजवळ ही घटना घडली. व्हॅन रस्त्यापासून सुमारे 40 फूट खाली खड्ड्यात पडली आणि हा अपघात (accident) झाला. हा अपघात झाला तेव्हा व्हॅन प्रचंड वेगामध्ये होती.

या अपघाताप्रकरणी केंद्रीय परराष्ट्र आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी या दुर्घटनेत आपले जवळचे आणि प्रियजन गमावलेल्या शोकसंतप्त कुटुंबांप्रती शोक व्यक्त केला. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये ‘इडुक्की येथे झालेल्या अपघातात (accident) सबरीमाला यात्रेकरूंच्या निधनाने खूप दुःख झाले. शोकाकुल कुटुंबियांसाठी मनापासून संवेदना. मी जखमींच्या लवकर आणि पूर्ण बरे होण्यासाठी प्रार्थना करतो असे लिहिले आहे.

हे पण वाचा :
संजय राऊत होणार भारत जोडो यात्रेत सहभागी; घेणार राहुल गांधींची भेट
सुप्रिया सुळेंकडून शिंदे गटातील आमदाराचे कौतुक; ट्वीट करत म्हणाल्या…
ठाकरे गटाचे आणखी 3 खासदार आणि 8 आमदार शिंदेंच्या संपर्कात, ‘या’ खासदाराचा मोठा दावा
50 आमदारांच्या गुवाहाटी दौऱ्याची तारीख ठरली !; ‘या’ दिवशी जाणार कामाख्या देवीच्या दर्शनाला
भगतसिंग कोश्यारी यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया; म्हणाले…..