हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकार प्रमाणेच नागरिक सुद्धा काळजी घेताना दिसत आहेत. करोनासंबधी जनजागृतीसाठी अनेक सेलिब्रिटी सध्या जनजागृती करताना दिसत आहेत. करोनाला रोखण्यासाठी संपूर्ण स्वच्छता आणि दक्षता घेण गरजेचं असल्याची जाणीव भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि माजी फलंदाज सचिन तेंडुलकर यांनीही लोकांना करुन दिली आहे. दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने आता जगभरातील करोना व्हायरसची तुलना कसोटी क्रिकेटशी केली आहे. करोनाला टाळण्यासाठी टीम वर्क आणि संयम आवश्यक असल्याचे सचिनने म्हटले आहे.
टाइम्स ऑफ इंडियासाठी लिहिलेल्या लेखात सचिन तेंडुलकरने कसोटी क्रिकेटचा हवाला देत कोरोना व्हायरसचा पराभव करण्याचा मंत्र दिला. सचिन तेंडुलकर म्हणाला, ‘कसोटी क्रिकेट तुम्हाला संयमाचे महत्त्व सांगते. जेव्हा आपल्याला खेळपट्टीची परिस्थिती आणि गोलंदाजी समजत नाही तेव्हा आक्रमण करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे डिफेन्स. त्यामुळं आता जर आपल्याला करोनापासून बचाव करायचा असेल तर आपल्याला धैर्याची गरज आहे.
सचिन तेंडुलकर पुढे म्हणाले की, संपूर्ण जग करोना व्हायरस विरुद्ध युद्ध करीत असताना, आपल्या सर्वाना क्रिकेटच्या सर्वात जुन्या प्रकारापासून धडा शिकण्याची आवश्यकता आहे.कोरोना व्हायरस विरुद्ध सर्व देशांना एकत्र लढावे लागेल. जर क्रिकेटच्या भाषेतच सांगायचे झालं तर, वन-डे क्रिकेटमध्ये ज्याप्रमाणे वैयक्तिक कामगिरीचा संघाला फायदा होतो. मात्र, टेस्ट क्रिकेट पूर्णपणे भागीदारी आणि टीम वर्कवर आधारित आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये पुनरागमन करता येते. आपण पहिली संधी गमावल्यास नेहमीच दुसरी संधी असते. त्यामुळं कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढाईत सध्या आपण संघर्षांच्या सत्रात लढत आहोत. या सत्राचा सामना आपल्याला धैर्याने करावा लागेल.
भारतात करोना व्हायरसमुळे ४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर देशात संक्रमणाची जवळपास १७७ प्रकरणांची नोंद झाली आहे. तर जगभरात करोना व्हायरसमुळे ८ हजाराहून अधिक लोक मरण पावले आहेत. तर जगभरात २ लाखांहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि ही संख्या सातत्याने वाढत आहे.
दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.