Tuesday, January 7, 2025

सचिन पुन्हा एकदा दिसणार क्रिकेटच्या मैदानात; चौकार- षटकारांचा पाऊस पडणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताचा माजी खेळाडू आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहे. उद्या 18 जानेवारीला बंगळुरू येथे श्री मधुसूदन साई ग्लोबल मानवतावादी मिशनसाठी चॅरिटी मॅच खेळेल. वन वर्ल्ड वन फॅमिली कप (One World One Family Cup) अंतर्गत, मुद्देनहल्लीच्या सत्य साई व्हिलेजमधील साई कृष्णन क्रिकेट स्टेडियमवर ha सामना होणार असून सचिनच्या संघाविरुद्ध युवराज सिंगचा (Yuvraj Singh) संघ मैदानात उतरेल. दोन्ही संघातील खेळाडूंची यादीही समोर आली आहे.

वन वर्ल्ड वन फैमिली कपचे उद्दिष्ट हेच आहे कि, 5,000 हून अधिक ग्रामीण विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणे. सुनील गावस्कर यांच्यासह 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघातील जवळपास प्रत्येक खेळाडू हा सामना पाहण्यासाठी उपस्थिती लावतील. मधुसूदन साई ग्लोबल मानवतावादी मिशनने यापूर्वीच महत्त्वपूर्ण योगदान देत आत्तापर्यंत तब्बल 28,000 हून अधिक मोफत हृदय शस्त्रक्रिया केल्या आहेत आणि ग्रामीण भागात 3 दशलक्षाहून अधिक शालेय मुलांना दैनंदिन पोषण पुरवले आहे.

कसा आहे सचिनचा संघ –

सचिन तेंडुलकर, नमन ओझा, उपुल थरंगा, अल्विरो पीटरसन, बद्रीनाथ, इरफान पठाण, अशोक दिंडा, अजंता मेंडिस, हरभजन सिंग, मॉन्टी पानेसर, डॅनी मॉरिसन, आरपी सिंग

युवराजच्या संघात कोण कोण आहे –

युवराज सिंग, पार्थिव पटेल, मोहम्मद कैफ, डॅरेन मॅडी, अलोक कपाली., कालुविथरना, युसूफ पठाण, जेसन क्रेझा, मुथैया मुरलीधरन, मखाया ऍन्टिनी, चामिंडा वास, व्यंकटेश प्रसाद