सचिन वाझे माफीचा साक्षीदार घोषित; अनिल देशमुखांविरोधात सर्व माहिती देण्यास तयार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासमोरील अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरोधात सुरू असलेल्या कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याला माफीचा साक्षीदार घोषित करण्यात आले आहे. माफीचा साक्षीदार होण्यासाठी सचिन वाझेने दाखल केलेला अर्ज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाने आज स्वीकारला.

सचिन वाझे यांना आज सीबीआयच्या विशेष कोर्टापुढे व्हीसीद्वारे हजर करण्यात एके. यावेळी वाझे यांनी कथित भ्रष्टाचार प्रकरणात माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली. त्यासाठी त्यांनी विशेष सीबीआय न्यायालयात अर्ज दाखल केला. सीबीआयने त्यांच्या अर्जाला सशर्त मंजुरी दिली. या कथित भ्रष्टाचार प्रकरणात देशमुख यांच्यासह अन्य आरोपींविरोधात आपल्याकडे असलेली माहिती देण्याची तयारी वाझेंनी दाखवली आहे. त्यानंतर कोर्टाने निर्णय दिला.

वाझे याला आता 7 जूनच्या सुनावणीत प्रत्यक्ष कोर्टापुढे हजर करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले आहेत. या प्रकरणात आता सचिन वाझे नियमित जामीनासाठी अर्ज करता येणार आहे. वाझे यांच्या अर्जाला मंजुरी देण्यात अली असल्यामुळे हा अनिल देशमुख यांच्यासाठी धक्का मानला जात आहे.

Leave a Comment