महाविकास आघाडीसोबत जाऊन राजू शेट्टींची काशी झाली; सदाभाऊंचा टोला

shetty khot
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या यादीतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचं नाव वगळल्याची चर्चा रंगू लागली असून याच पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर निशाणा साधला. महाविकास आघाडीसोबत जाऊन राजू शेट्टींची काशी झाली असा टोला त्यांनी लगावला.

महाविकास आघाडीसोबत जाऊन काशी झाली म्हणून राजू शेट्टी यांनी आता आत्मक्लेष यात्रा दुसऱ्यांदा काशीपर्यंत काढावी, अशा शब्दात खोत यांनी शेट्टींवर निशाणा साधला. आमच्या वेळेस सरकारकडून भ्रमनिराश झाल्याचे सांगून राजू शेट्टी यांनी पाठिंबा काढून आत्मक्लेश यात्रा काढली होती. आता माझी काशी झाली म्हणून त्यांनी काशीपर्यंत यात्रा काढावी असा टोला सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांना लगावला आहे.

दरम्यान, तत्पूर्वी राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस वर घणाघाती टीका केली. 2019 च्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी पक्षात हा समझोता झाला होता. तो पाळायचा की नाही पाळायचा की पाठीत खंजीर खुपसायचा आणि कशा पद्धतीने पाळायचा हे ज्यांनी शब्द दिला त्याने ठरवायचं आहे. आम्ही त्यांच्या मागे आमदारकी द्या म्हणून कधी गेलो नव्हतो, असं शेट्टी म्हणाले.