ठाकरे व पवार पाठीत खंजीर खुपसणारे, हे चंद्रकांत पाटलांचे भाष्य वास्तववादी- सदाभाऊ खोत

0
32
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पाठीत खंजीर खुपसणारे आहेत अस विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर आता रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनीही चंद्रकांतदादांच्या सुरात सूर मिसळत शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर सडकून टिका केली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्यावर केलेले भाष्य हे वास्तववादी असून, आपण समहमत असल्याचे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. शरद पवार हे चकवा देणारे राजकारणी आहेत, हे देशपातळीवरील राजकारण्यांना माहित झालं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे व शरद पवारांची चाल महाराष्ट्राला माहित झाली आहे. म्हणून चंद्रकांत पाटलांनी केलेल्या विधानाशी मी सहमत असल्याचं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे

शरद पवारांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिले आहे की, शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल कुठेही विकता आला पाहिजे. परंतु ज्यावेळी कृषी विषयक सभागृहात आले, त्यावेळी मात्र त्यास मूक संमती दिली. त्यांनी सत्तेसाठी काँग्रेस पक्षासोबत हातमिळवणी केली. त्यांची कुटनीती सर्वाना माहीत आहे असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here