सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखालील “वारी शेतकऱ्यांची” या पदयात्रेच्या चौथ्या दिवसाची सुरुवात आज हाय वोल्टेज ड्रामाने झाली आहे. आज पुणे बेंगलोर महामार्गावर पोलीस प्रशासनाकडून सदाभाऊंची पदयात्रा अडवण्यात आली. यावेळी पोलिस आणि सदाभाऊ खोत यांच्यात थोडी बाचाबाची पाहायला मिळाली. यावेळी जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही, असे सदाभाऊ खोत यांनी पोलीस प्रशासनाला ठणकावून सांगितले.
रयत क्रांती संघटना सरपंच परिषद आणि इतर विविध घटक पक्षांना घेऊन चाललेल्या सदाभाऊ खोत यांचा मोर्चा अचानक पुणे-बंगलोर महामार्गावर मधोमधच थांबला. प्रशासकीय यंत्रणा आमच्याकडे लक्ष देत नाही आणि आम्हाला सहकार्य करत नाही असे म्हणत सदाभाऊ खोत यांनी रस्त्यावरच ठाण मांडले. यावेळी आंदोलकांची भूमिका चिघळत गेली आणि आंदोलन रस्त्याच्या दुतर्फा जाऊन बसले त्यामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे बंद झाली मात्र पोलिसांनी केलेल्या विनंतीला मान देत सदाभाऊ खोत रस्त्यावर उठले आणि पुन्हा यांचा मोर्चा पुढे सुरू झाला.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/793078042423782/?extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C&mibextid=l2pjGR
दरम्यान, माझी लढाई बुळग्या सैनिकांबरोबर नाही माझी लढाई लुटाऱ्यांबरोबर आहे असं सदाभाऊंनी म्हंटल. शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. आम्ही आमच्या बापाची खळ राखण करायला आलोय. घरात बसून सावलीला ढुंगण टेकवणाऱ्यांनो, लहान लहान मुले चालत आहे त्यांचा अपमान करू नका. जे आमच्यावर टीका करत आहेत बुळगे सैनिक आहेत. माझी लढाई बुळग्या सैनिकांबरोबर नाही माझी लढाई लुटाऱ्यांबरोबर आहे असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी आक्रमक पवित्रा घेतला.