SBI ची जबरदस्त योजना! 10 लाख भरा अन् मिळवा 21 लाख रुपये; कसे ते जाणुन घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : साधारणपणे, जसजसे वय वाढते तसतसे गुंतवणुकीबाबत बहुतेक लोकांची जोखीम घेण्याची क्षमता कमी होते. निवृत्तीनंतर कोणत्याही सामान्य गुंतवणूकदाराला त्याच्या पैशातून कोणतीही जोखीम पत्करायची नसते. ज्येष्ठ नागरिक झाल्यानंतर पैसा जोखीम पत्करता येत नाही हे खरे, पण पैशातून पैसे कमवण्याचे पर्याय संपलेत असे नाही. बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना आहेत ज्यात खात्रीशीर उत्पन्न उपलब्ध आहे. यापैकी एक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ची ज्येष्ठ नागरिक मुदत ठेव योजना आहे. जर तुम्ही नुकतेच निवृत्त झालेले असाल आणि तुमच्याकडे भरीव निधी असेल, तर तुम्ही SBI च्या ज्येष्ठ नागरिक FD योजनेत दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करू शकता.

चांगल्या भविष्यासाठी योग्य गुंतवणुक महत्वाची असते. गुंतवणुक करताना ती कुठे करावी? आपल्याला चांगला मोबदला कोण देईल याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न असतात. अशात जर वयस्कर व्यक्ती असेल तर गुंतवणुक करताना खूप जास्त विचार करुनच निर्णय घेतात. वाढत्या वयानुसार गुंतवणुक करताना रिस्क घेण्याची क्षमता कमी होत असते. तेव्हा अशावेळी कमी रिस्कमध्ये चांगला मोबदला कोण देतंय याला प्रधान्य दिले जाते. आज आम्ही तुम्हाला स्टेट बँक आॅफ इंडियाच्या एक अतिशय सुरक्षित गुंतवणुक योजनेबाबत माहिती देणार आहोत. SBI च्या सिनिअर सिटीझन टर्म डिपोझिट स्किम अंतर्गत एकदा १० लाख रुपये भरल्यानंतर त्याबदल्यात बँक २१ लाख रुपये देते.

सीनियर सिटीजन टर्म डिपॉजिट स्कीम

ह्या स्कीममध्ये गुंतवणूक करून उतार वयातही जेष्ठ मंडळी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या पैश्यांतून पैसे कमावू शकतात. त्यासाठी त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सीनियर सिटीजन टर्म डिपॉजिट स्कीममध्ये अधिक अवधीच्या कालावधीसाठी गुंतवूणक केल्यास त्यांना खूप चांगला परतावा मिळू शकतो. साधारणतः एखाद्या गुंतवणुकीत ज्येष्ठ नागरिकांना सामान्य गुंतवणूदारांच्या तुलनेत अधिक व्याजदर देण्यात येते. जर एखाद्या FD वर बँक सामान्य ग्राहकांना 6.5 टक्के व्याजदर देत असेल तर तिथेच ती बँक जेष्ठ नागरिकांना तेव्हढ्याच गुंतवणुकीवर 7.5 टक्के व्याजदर देते.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) FD –

(SBI) स्टेट बँक ऑफ इंडियाच्या FD स्कीममध्ये जेष्ठ नागरिकांनी गुंतवलेले 10 लाख रुपये 10 वर्षानंतर मॅच्युरिटी पूर्ण होताच 21 लाख रुपये होतील. SBI च्या FD कॅल्क्युलेटरनुसार गुंतवणूकदारांना 10 लाख रुपयांवर वार्षिक 7.5 रुपये व्याजदर देत आहे. यांनुसार 10 वर्षानंतर गुंतवणूकदारांना 11,02,349/- रुपये मिळतील. म्हणजेच 10 वर्षांच्या कालावधीनंतर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या FD स्कीममध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना एकूण 21,02,349/- रुपये मिळतील . SBI ने 15 फेब्रुवारी 2023 पासून 2 कोटी रुपयांपेक्षा कमी गुंतवणुकीवर 0.25 टक्के व्याजदर वाढवले होते. या आधी SBI ने 13 डिसेंबर 2022 रोजी व्याजदर वाढवले होते. सदर स्कीममध्ये गुंतवणूक करून जेष्ठ नागरिक आपली आजवरची बचत दुप्पट करू शकतात