सांगली । प्रतिनधी
ज्यांच्या विरोधात दहा वर्षे आंदोलनं केली. गावागावात संघर्ष निर्माण झाला. ज्यांनी आंदोलनात घूसा, दंगल घडवा असे आदेश दिले. त्या राष्ट्रवादीच्या व साखर कारखानदारांच्या मांडीला मांडी लावून बसण्याचे पाप खा.राजू शेट्टी यांनी केले आहे. खासदारकीच्या लोण्यासाठी हा बोका बहुजन समाजात भांडण लावत होता. असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला.
आम्हीही गावागावातील वाद मिटवणार असून सर्वपक्षातील कार्यकर्त्यांना बरोबर घेवून लढणार आहे. यावेळी धैर्यशील माने, उल्हास पाटील, सी.बी.पाटील, आनंदराव पवार, विक्रम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. राजू शेट्टी यांच्या विजयासाठी ज्यांनी साथ दिली, विरोधकांना अंगावर घेतलं त्या विकास आघाडीच्या नेत्यांशी काही चर्चा न करता काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बाजूला गेले. हात स्वच्छ असणारे भ्रष्टाचारी लोकांबरोबर गेलेच कसे? माझाच निर्णय योग्य आहे, मी कुठेही जावून निवडून येवू शकतो. असा दांभिकपणा व गर्व त्यांच्या अंगात भिनला आहे. राजू शेट्टी यांनी भावनिक व ढोंगीपणाने एक व्होट एक नोट मोहिम राबविली. परंतू काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी केल्यानंतर पैशासाठी डबा ठेवायचा गरज नाही. ते पैशाच्या ढिगावरच बसले आहेत. पैशाचा डबा व ढिग गायब करतील आणि विधानसभेला त्यांच्या बरोबरीला राहणार नाहीत. कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा आव आणून त्यांची पुरती वाट लावतील. मेंढपाळांना चार पैसे मिळतील, त्यांचे जीवनमान उंचावेल यासाठी खा.महात्मे यांनी केंद्र सरकारकडे शेळया व मेंढया परदेशात निर्यात कराण्याची मागणी केली होती. त्याला राजू शेट्टी यांनी विरोध केला.
सांगली लोकसभेसाठी धनगर समाजाचे गोपीचंद पडळकर यांना स्वाभिमानीचे तिकिट दिले तर त्यांच्या व्यवसायाला पाठींबा द्यावा लागेल म्हणूनच त्यांना ऐनवेळी उमेदवारी नाकारली. त्यामागे जातीयवादी विचारसरणी असल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला.