राजू शेट्टी हे अलीबाबा चाळीस चोरांच्या टोळीचे भागीदार : सदाभाऊ खोत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे

कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना आली बाबा चाळीस चोर असे म्हणणारे स्वाभिमानीचे नेते खासदार राजू शेट्टी आता चोरांच्या टोळीचे भागीदार बनले असल्याचे टीकास्त्र कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगलीत सोडले. वर्षानुवर्षे काटा मारणाऱ्या कारखानदारांविरोधात लढाई करणारे शेतकऱ्यांचे नेते मग, कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या पंगतीला बसून काटा मारण्याचा हिस्सा मागायला गेलेत का? असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला.

ते जिल्हाधिकारी कार्यालयात भाजपचे लोकसभा उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कृषी राज्यमंत्री खोत आले होते. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सत्ता पिपासु जनता अशी निवडणूक आहे मात्र त्यामध्ये जनतेचा विजय होईल स्वाभिमानीचे नेते शेट्टी यांचा सध्या संयम सुटलेला आहे त्यामुळे बेताल वक्तव्य करू लागले आहेत सेफ्टी चे काय बोलले ते शब्द मी वापरणे योग्य नाही मात्र तुम्ही अडीच वर्षे कोणासोबत होता याचा विसर पडला आहे. शेट्टींचा कोणता पक्ष भरायचा शिल्लकच राहिला नाही.

अगदी वंचित बहुजन आघाडी सोबतही त्यांनी निवडणुकीबाबत चर्चा केली होती. मात्र तिथं काही जमत नसल्याने परंपरागत विरोधक असलेले कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या पंक्तीला बसणे त्यांनी पसंत केले आहे. वर्षानुवर्षे शेट्टी यांच्याकडून कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना अलीबाबा चाळीस चोर अशी टीका करीत होते. मात्र या चोरांच्या टोळीचे शेट्टी भागीदार बनले असल्याची टीका केली.

उसाचा काटा मारणाऱ्या विरोध लढाई करणारे शेट्टी आता कारखानदारानी मारलेल्या काट्याचा हिस्सा मागायला गेले आहेत. हे आता हातकणंगले येथील जनतेलाही समजलेले आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी सोबत राहून बुलढाणा आणि वर्धा या दोन लोकसभेच्या जागांची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली त्यापैकी एक ही जागा देण्यात आली नाही त्यामुळे आघाडीमध्ये शेट्टींचे काय स्थान आहे हे समजलेले आहे, अशी टीकाही राज्यमंत्री खोत यांनी यावेळी केली.

लोकसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाचे –

शिवेंद्रराजेंना मीच निवडूण आणणार – उदयनराजे भोसले

पुरूषोत्तम जाधवांचा शिवसेनेत प्रवेश, उदयनराजे भोसलेंच्या विरोधात लढवणार लोकसभा

स्मिता आर आर पाटील यांना सांगली लोकसभा मतदार संघातून उमेदवारी द्या

उदयनराजे भोसले यांच्या विरोधात तृथीयपंथी उमेदवार रिंगणात

साहेब आपण आपल्या निर्णयाचा पुर्नविचार करा, रोहित पवारांची आजोबांना भावनिक साद

नगरमध्ये राष्ट्रवादीकडून सुजय विखेंना प्रतिस्पर्धी कोण ?

Leave a Comment