आजोबांच्या सल्ल्याला नातूच मानत नाही; रोहित पवारांच्या चिपळूण दौऱ्यावरून सदाभाऊंची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रशासनावर ताण पडत असल्याने राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागांत दौरे टाळावेत अस आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. तरीही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि पवारांचे नातू रोहित पवार यांनी चिपळूणचा दौरा केल्यानंतर माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी पवारांवर टीका केली आहे.

राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे करून नयेत, असं आजोबांनी सांगितलं….. आजोबांच्या सल्ल्याला नातूच मानत नाही… कर्जत-जामखेडचे आमदार चीपळूणच्या दौऱ्यावर…. आजोबांचा हा सल्ला फक्त राज्यपाल व फडणवीसांकरिता होता?, असा सवाल सदाभाऊ खोत यांनी विचारला.

रोहित पवार कोकण दौऱ्यावर

कोकणात मुसळधार पावसामुळे आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी कोकणचा दौरा केला. या संकटात उध्वस्त झालेले संसार नव्याने उभे करावे लागणार आहे. त्यासाठी आपल्या सर्वांच्या मदतीची गरज आहे, असं म्हणत रोहित पवार यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना नागरिकांना मदतीचं आवाहन केलं.

Leave a Comment