Sahyadri Express : सह्याद्री एक्सप्रेस पुन्हा एकदा सुरु; पश्चिम महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी

Sahyadri Express
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोल्हापूरवरून राज्याच्या राजधानी मुंबईला जाण्यासाठी कोरोना महामारीच्या आधी सह्याद्री एक्सप्रेस (Sahyadri Express) चालवली जात होती. कोल्हापूरकरांना या एक्सप्रेसचा मुंबईशी जोडण्यासाठी मोठा फायदा होत होता , तसेच फक्त कोल्हापूरचं नव्हे तर सांगली सातारा, कराड येथील प्रवाशांसाठी सुद्धा ही ट्रेन महत्त्वाची होती. पण कोरोना महामारीत सह्याद्री एक्सप्रेस बंद करण्यात आली होती. परंतु आता पुन्हा एकदा सह्याद्री एक्सप्रेस सुरु करण्यात आली नाही. दिवाळीसाठी होणारी गर्दी आणि  स्थानिक पुढाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे कोल्हापूरसाठी सह्याद्री एक्सप्रेस परत सुरु होणार आहे.

नोव्हेंबर पासून सह्याद्री एक्सप्रेस कोल्हापूरकरांच्या  सेवेत : (Sahyadri Express) 

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरील फलाटची लांबी वाढवण्याचे काम सुरु असल्यामुळे सध्या तात्पुरत्या स्वरूपात सह्याद्री एक्सप्रेस कोल्हापूर ते पुणे या मार्गांवर धावणार आहे. दिवाळीच्या सणासाठी होणारी गर्दी लक्षात घेत रेल्वे प्रशासन पुणे ते कोल्हापूर दरम्यान सह्याद्री एक्सप्रेस (Sahyadri Express) चालवणार  आहे. येत्या 5 नोव्हेंबर पासून सह्याद्री एक्सप्रेस कोल्हापूरकरांच्या सेवेत हजर होणार आहे. 5 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान ही ट्रेन कोल्हापूर ते पुणे धावेल त्यानंतर मुंबईपर्यंत तिचा प्रवास वाढवला जाणार आहे.

कोल्हापूर रेल्वे स्थानकावरून दररोज रात्री ११.३० ला सुटणार :

जुलै महिन्यात खासदार महाडिक यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेत कोल्हापूर रेल्वे स्थानकाच्या सुधारणा आणि नव्या रेल्वे गाड्यांसाठी चर्चा केली होती तसेच  धैर्यशील माने व संजय मंडलिक यांच्यासह रेल्वे प्रवासी संघटनांनी या सेवेसाठी पाठपुरावा केला होता. सह्याद्री एक्स्प्रेस (Sahyadri Express) कोल्हापूर रेल्वे स्थानकावरून दररोज रात्री ११.३० ला सुटेल. पुणे येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ७.४५ वाजता पोहोचेल. तेथून त्या रात्री ९.४५ सुटेल आणि कोल्हापुरात दुसऱ्या दिवशी पहाटे पावणे सहाला येईल. लवकरच मिरज ते कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सुरू होणार असल्याची आणि कोल्हापूरातून आणखी काही नव्या गाड्या सुरू केल्या जाऊ शकतात. त्यामुळे कोल्हापूरकरांसाठी प्रवास अधिक सोयीचा होईल.