साईबाबा जन्मस्थळाचा वाद संपुष्टात; मुख्यमंत्र्यांनी ते विधान मागे घेतलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । साईबाबा जन्मस्थळावरून सुरु झालेल्या वाद आता संपुष्टात आला आहे. पाथरीचा विकास साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून नव्हे तर तीर्थक्षेत्र म्हणून करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले व त्यास पाथरी व शिर्डीकरांनी संमती दिल्याने वादावर पडदा पडला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मराठवाडा दौऱ्यात पाथरी हे साईबाबांचे जन्मस्थळ आहे असं विधान करत. त्या अनुषंगाने पाथरीचा विकास करण्यात येईल. त्यासाठी १०० कोटींचा पाथरी विकास आराखडा तयार असल्याचं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. ज्यानंतर वाद निर्माण झाला होता. शिर्डीमध्ये या विधानाचे तीव्र पडसाद उमटल. दरम्यान रविवारी शिर्डी बंदचीही हाक देण्यात आली.

आज शिर्डी ग्रामस्थांचं शिष्टमंडळ तसेच पाथरीचे एक शिष्टमंडळ यांची आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही बाजूकडून सामोपचाराची भूमिका घेतली गेली. साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून नाही तर तीर्थक्षेत्र म्हणून पाथरीचा विकास होणार असेल तर त्यास आमची कोणतीही हरकत नाही, अशी भूमिका शिर्डीतील ग्रामस्थ प्रतिनिधींनी बैठकीत मांडली. ही भूमिका दोन्ही बाजूने मान्य झाली. मुख्यमंत्र्यांनीही पाथरीचा साईबाबांचे जन्मस्थळ हा उल्लेख मागे घेतला. ‘पाथरी तीर्थक्षेत्र विकास’ हे नाव योजनेसाठी निश्चित झाले आणि वाद संपुष्टात आला. ग्रामस्थांचे प्रतिनिधी म्हणून बैठकीसाठी उपस्थित राहिलेले खासदार सदाशिव लोखंडे यांनी बैठकीबाबत समाधान व्यक्त केले. शिर्डीकरांच्या बाजूने हा वाद आता संपला आहे, असे त्यांनी सांगितले. तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमच्या सगळ्या मागण्या ऐकल्या तसंच त्या मान्यही केल्या. त्यांच्या आश्वासनानंतर शिर्डीकर समाधानी आहेत. आता नवा कोणताही वाद निर्माण होणार नाही” असंही आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलं असल्याचं शिर्डी संस्थानचे कमलाकर कोठे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे आपल्या विधानाबाबत स्पष्टीकरण देत म्हणाले, पाथरी हे साईबाबांचे जन्मस्थळ आहे की नाही, हे मला माहिती नाही. मी काही संशोधक नाही. जी माहिती मिळाली त्यानुसार मी बोललो. मात्र, बंद पुकारण्यापूर्वी तुम्ही माझ्याशी बोलायला हवे होते. आता जन्मस्थळाचा कोणताही वाद काढू नका. पाथरीला तीर्थक्षेत्र विकास म्हणून निधी देऊ. राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मला सर्व जनता सारखीच. आपण सर्वजण साईबाबांसमोर नमूया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत दोन्ही बाजूच्या ग्रामस्थांना केले.

 

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

हे पण वाचा-

साईबाबा जन्मस्थानाचा शोध मुंबईकराने लावला; वाचा स्पेशल रिपोर्ट

गर्दीत अडकलेले केजरीवाल उमेदवारी अर्ज न भरताच परतले 

जेव्हा मुख्यमंत्री तहसीलदारासाठी खुर्ची सोडतात; वाचा नेमकं काय घडलं..

जे.पी. नड्डा भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष

 

Leave a Comment