Date with Saie | सई ताम्हणकरच्या पहिल्या वेबसीरिजचे पोस्टर रिलिज

0
63
Sai Tamhankar
Sai Tamhankar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | सैफ अली खान, आर माधवन, भूमी पेडणेकर, नवाजुद्दीन सिद्दिकी अशा बॉलीवूड ए–लिस्टर सेलेब्सनी वेबसीरिजमध्ये काम केल्यावर आता मराठीतली सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर लवकरच ‘डेट विथ सई’ ह्या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे.

सई ची ही वेबसिरिज डिसेंबर पासून सुरु होणार असून तिच्या चाहत्यांमधे त्याविषयी खूप उत्कंठा असल्याचे दिसत आहे. सईची ही वेबसिरिज एक थरार मालिका असणार असल्याचे समजत आहे. ह्यामध्ये सई स्वतःच्याच म्हणजेच सई ताम्हणकरच्याच भूमिकेत असेल. सई ही पहिलीच भारतीय अभिनेत्री आहे, जी वेबसीरिजमध्ये स्वतःच्याच भूमिकेत दिसेल. ह्या सूत्रांच्या अनुसार, ह्या वेबसीरजमध्ये सईचा वेडसर फॅन तिचा पाठलाग करत असतो. जो सईच्या नकळत तिचे आपल्या मोबाइल कॅमेऱयात चित्रीकरण करत असतो. ही थरारक वेबसीरिज पाहताना तुमच्या अंगावर काटा येईल.

सई ताम्हणकर म्हणली, ‘डेट विथ सई’ सारखी थरारशैलीचा चित्रपट वा मालिका मी कधीच केली नव्हती. त्यामूळे ही वेबसीरिज माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे. एका फॅनचे तुमच्यावरच प्रेम कसं जीवघेणंही ठरू शकते, त्याची अनुभूती देणारी ही वेबसीरिज आहे. वेबसीरिजच्या विश्वात डेट विथ सईने मी पाऊल ठेवत आहे. आणि डिसेंबरमध्ये येणाऱया ह्या वेबसीरिजची मी खूप उत्सुकतेने वाट पाहत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here