व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

साईबाबा संस्थानच्या दानपेटीत इतके पैसे कि बँकांकडे ठेवायला जागाच नाही; शेवटी RBI ने उचललं मोठं पाऊल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। सबका मालिक एक असा महामंत्र देणाऱ्या शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी अनेक लोक जात असतात. त्यावेळी दान म्हणून कित्येक जण पैसे देतात. रोज साईबाबांच्या दानपेटीत लाखो रुपये जमा होतात. साईबाबा संस्थांकडे दानपेटीत जमा होणारी रक्कम इतकी मोठी आहे कि बँकांकडे ते पैसे ठेवायला जागाच नाही. शेवटी यावर आता RBI ने मोठे पाऊल उचलले आहे.

भक्तांनी श्रद्धेपोटी दिलेल्या पैसेरूपी दानामुळे शिर्डी संस्थांची डोकेदुखी वाढली आहे. अनेक भक्त दानपेटीत 1, 2, 5, 10 अशा रुपयांची नाणी टाकत असतात. याचाच परिमाण म्हणजे या नाण्यांची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणावर झालीय की आता बँकाही त्या स्वीकारायला तयार नाहीत. नाणी खूप साठल्याने त्याचे काय करायचे? हा प्रश्न गेल्या काही दिवसात संस्थानला पडला होता. त्यावर आता रिझर्व्ह बँकेने तोडगा शोधून काढला आहे.

दर आठवड्याला 7 लाख नाणी जमा –

साई बाबांच्या दानपेटीमध्ये आपण विचार करू शकणार नाही एवढे पैसे साठत असतात. दर आठवड्याला सरासरी ७ लाख तर वर्षाला तब्बल साडेतीन कोटी नाणी जमा होतत. शिर्डीतील 12 हून अधिक तर नाशिकच्या एका राष्ट्रीयकृत बँकेत साईसंस्थाचे खाते आहे. शिर्डीतील प्रत्येक बँकेमध्ये दीड ते दोन कोटीपेक्ष्या जास्त नाणी साचल्याने बँकांना नाणी स्वीकारणे कठीण झाले होते. तर काही बँकांनी संस्थानच्या ठेवी स्वीकारण्यास असमर्थता दाखवली होती. अश्या परिस्थितीमध्ये रिझर्व्ह बँकेने त्यांना दिलासा दिला आणि तोडगा शोधून काढला .

RBI च्या निर्णयामुळे मिळाला दिलासा –

साईबाबा संस्थांकडे रोज मोठ्या प्रमाणात हजारो भक्त हजेरी लावतात. प्रत्येकजण आपापल्या परीने दानपेटीत पैसे दान करत असतो. मात्र रोज दानपेटीत इतके पैसे जमा होतात कि बँकांना एवढी नाणी कुठे ठेवायची असा प्रश्न पडला होता. त्यामुळे बँकांनी साईबाबा संस्थांच्या दानपेटीतील पैसे बँकेत जमा करून घेण्यास असमर्थता दर्शवली होती. मात्र आता RBI ने शिर्डी संस्थानला दिलासा देत आपण हि नाणी स्वीकारू असे सांगितले आहे. अनेक राष्ट्रीयकृत बॅंकांच्या शाखांमध्ये सुट्ट्या पैशांचा (नाण्यांचा) तुटवडा भासत असतो. आता अशा बँकांमध्ये शिर्डीच्या दानपेटीतील नाणी पाठवण्यात येणार आहे. यामुळे इतर बँकांचाही फायदा होणार असून शिर्डी संशनलाही RBI च्या निर्णयाने दिलासा मिळाला आहे. .