Tuesday, February 7, 2023

कराडकरांसाठी अभिमानाची गोष्ट! सायमा पठाणची राज्य किशोरी कबड्डी संघात निवड

- Advertisement -

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
लातूर येथे झालेल्या किशोरी गटाच्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत कु. सायमा पठाण हिने नेत्रदीपक खेळाचे प्रदर्शन केल्याने तिची महाराष्ट्र राज्य कबड्डी असोशिएसनच्या किशोरी गटाच्या राज्य संघात निवड झाली आहे. बोकारो (झारखंड) येथे होणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपद किशोर – किशोरी कबड्डी स्पर्धेसाठी राज्य असोशिएसनचा संघ नुकताच रवाना झाला आहे. सायमा पठाण हिचा लिबर्टी मजदूर मंडळाच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष सुभाष काका पाटील, उपाध्यक्ष अरुण जाधव, सत्यनारायण मिनियार, मुनीर बागवान, मानसिंग पाटील, सचिन पाटील, राष्ट्रीय खेळाडू फिरोज पठाण, प्रशिक्षक रामचंद्र चौगुले, राष्ट्रीय खेळाडू इंद्रजित पाटील, जितेंद्र जाधव, राजेंद्र जाधव दादासाहेब पाटील, गणेश पाटील, सुरेश थोरात, भास्कर पाटील, विशाल शिंदे, प्रवीण शिंदे, विनोद कसबे, अमित शिंदे, अर्जुन पवार, अमित पाटील, अर्जुन वास्के, मनोज नीलाखे आदी उपस्थित होते.

- Advertisement -

लिबर्टी मजदूर मंडळाचे अनेक खेळाडू तालुका, जिल्हा, राज्य व देशपातळीवर चमकले आहेत. कराड येथील सुसज्ज असे सोयीसुविधानी लिबर्टी मजदूर मंडळाचे मैदान आहे. दरवर्षी या मंडळाकडून राज्यस्तरीय मुला- मुलींच्या कबड्डी स्पर्धाचे आयोजन केले जाते. या मंडळाची खेळाडू सायमा पठाण हिच्या निवडीमुळे मंडळाचे नाव राज्यपातळीवर चमकणार असल्याचे गाैरवोद्गार अध्यक्ष सुभाष काका पाटील यांनी काढले.