पैठण : आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूर येथील वारीच्या सोहळ्यासाठी गेलेली संत एकनाथ महाराजांची पालखी सोहळा साजरा करून शनिवारी सायंकाळी सहा दिवसांनंतर पैठणला परतणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील एकूण ४० मोजक्या मानकऱ्यांच्या सहभागात शहरातील संत परंपरेत मनाचे स्थान असलेल्या एकनाथ महाराज्यांच्या पादुका पालखीला यंदा पंढरपूर येथील आषाढी वारीत मिळाला होता.
एकनाथ महाराज पादुका पालखी सोहळा दोन बसने पंढरपूर येथील सोहळ्यासाठी प्रस्थान झाला होता. पंढरपूर येथील आषाढी वारी सोहळ्यात संतांच्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने विविध भजन, कीर्तन, मंदिरात घेण्यात आले होते. संत एकनाथ महाराज यांचे पणजोबा यांच्या पुण्यतिथी व पांडुरंगाला नैवैद्य देण्याचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने साजरा झाला.
शनिवारी सकाळी पालखी प्रमुख नाथवंशज रघुनाथबुवा गोसावी पालखी वाले, योगेश महाराज गोसावी, रेखा कुलकर्णी, महालिंग महाराज नागरे, गंगाराम राऊत, चंद्रकांत खेडकर, ऋषिकेश महाराज नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पांडुरंगाच्या मंदिरात काला दहीहंडीचा,कीर्तन भजन मानकऱ्यांचा दर्शन सोहळा पार पडला.