हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. कराड तालुक्यातील धोंडेवाडी गावच्या कन्या साक्षी चंद्रकांत पाटील यांची नॅशनल एयरोनॉटिक्स अँड स्पेस एडमिनिस्ट्रेशन (NASA) या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेत प्रोजेक्ट साठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे त्या भारतातील एकमेव कॅंडिडेट आहेत. साक्षी यांची निवड सातारकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
साक्षी पाटील यांनी मुंबईतील गोरेगाव येथे आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. त्यांनतर भोपाळ येथील एयरोनॉटिक इंजीनियरिंग कॉलेज मध्ये पुढील शिक्षण पूर्ण केलं. तिथूनच त्यांची NASA मध्ये प्रोजेक्ट साठी निवड झाली. जगातील फक्त 10 जणांची या प्रोजेक्टसाठी निवड करण्यात आली आहे. त्यात साक्षी पाटील या भारतातील एकमेव कॅंडिडेट आहेत.
साक्षी पाटील या खर तर स्वातंत्र्य सैनिक कै. आनंदराव पाटील यांच्या नात आहेत. आनंदराव पाटील यांनी आपलं संपूर्ण आयुष्य गावासाठी वाहून दिले. 5 वर्ष गावचे सरपंच पद भूषविलेल्या आनंदराव पाटील यांनी गावात पहिल्यांदा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवला. लोकवर्गणीतून मुलांच्या शिक्षणासाठी शाळा काढली. आनंदराव पाटील यांनी गावासाठी केलेल्या कार्याने धोंडेवाडी गावाला ‘आनंदगाव’ संबोधले जाऊ लागले आहे. तर आता त्यांच्या नातीने तिच्या कार्यातून देशा महाराष्ट्रा सह साताऱ्याचे नाव उंच केले आहे..
हे पण वाचा :
Viral Video : महिला पोलिसाचा खाकी वर्दीतला ‘हा’ व्हिडिओ व्हायरल; SP ने दिले चौकशीचे आदेश
ICICI Bank च्या खातेदारांना WhatsApp द्वारे उपलब्ध होणार ‘या’ सुविधा
FD Rates : ‘या’ बँकांकडून ज्येष्ठ नागरिकांना FD वर दिले जाते 7.50% पर्यंत व्याज
Post Office च्या FD मध्ये आकर्षक व्याजदरासोबतच मिळतात ‘या’ सुविधा
Indian Overseas Bank च्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ, नवीन दर पहा