सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी आजपासून 11 नंतर दारू दुकाने बंद करून केवळ पार्सल सेवा देण्याचा आदेश दिला आहे. मात्र सातारा शहरातील एक दुकानदार चक्क दुपारचे दोन वाजले तरी निम्मे शटर उघडे ठेवून ग्राहकांची गर्दी करून दारू विक्री करत होता. तरीही दारू दुकानावर कोणतीही कारवाई करण्यासाठी फिरकलेही नाही. त्यामुळे दुकानदार तसेच तळीरामांनी प्रशासनाची व पोलिसांची चांगलीच गमंत जंमत केली.
सातारा शहरात शासनाचा आदेश झुगारून गंमत जंमत या वाईन शॉप चालकाने दुकानाचे निम्मे शटर उघडे ठेवून होते. दुपारचे दोन वाजले तरी दारूची विक्री बिनधास्त चालू होती. तरी प्रशासनला शहरातील या दुकानसंबधी काहीच थांगपत्ता नव्हता. मात्र किरकोळ व्यापारी, दुकानदार यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला होता. अशावेळी प्रशासनाने या वाईन शाॅपवर कारवाई न करता केवळ गंमत जंमत पाहण्यात धन्यता मान्यत दुर्लक्ष केल्याचे दिसून आले.
https://www.facebook.com/SataraBreakingNews/videos/2909291162724157
जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी सकाळी 11 नंतर दुकानात मद्य विक्री करण्यास मनाई केली आहे. सकाळी 11 नंतर केवळ पार्सल सेवा देण्यास परवानगी दिली आहे. परंतु साताऱ्याती दुकानदार मालकाची मुजोरी दिसून येत आहे. दुपारी 2 वाजले तरी बिनधास्त दारूविक्री असल्याने शासनाचे नियम धाब्यावर बसवले होते. दारु विक्री चालु असल्याने ग्राहकाची तुफान गर्दी झालेली होती. यावेळी सोशल डिस्टिन्सिंगचा फज्जा दिसून आला. त्यामुळे तळीरामांनी व दुकान मालकांने पोलिस व प्रशासनाची चांगलीच गंमत जंमत केली असल्याचे पहायला मिळाले.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा