सलमानला पाहण्यासाठी बारामतीकरांची गर्दी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बारामती प्रतिनिधी | नेहमी चर्चेत असणारा अभिनेता सलमान खान याचा दबंग थ्री या चित्रपटाचे शुटिंग सध्या बारामती परीसरात सुरू आहे. त्यामुळे सलमान खान ला पाहण्यासाठी युवक वर्ग व त्याचे फॅन गर्दी करत आहेत. बारामती व फलटण या परिसरात 22 जुलै पर्यंत या चित्रपटाचे शूटिंग होणार असून हा चित्रपट डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दिग्दर्शक प्रभुदेवा, अभिनेता सलमान खान सोबत अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा अरबाज खान महेश मांजरेकर यांची कन्या तर खलनायकाच्या भूमिकेत साउथ चा निकेतन डियर हा असणार आहे.

शूटिंग पाहण्यासाठी अभिनेता सलमान खान त्याचे चाहते मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत त्यामुळे सुरक्षारक्षक पोलिसांचा मोठा फौजफाटा येथे तैनात करण्यात आला आहे तरीही चाहत्यांचा उत्साह कणभरही कमी होत नाही. सोशल मीडियावर सलमान खान आपल्या गावात आल्याची बातमी पसरल्यानंतर आपल्या आवडत्या हिरोची एक झलक पाहण्यासाठी युवक अक्षरशा घरांच्या छतावर इमारतींवर चढून शिट्ट्या वाजवून जोरात आवाज देताना पहावयास मिळताहेत.

सध्या सलमान खानचा ओपन जीप मधला व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होताना दिसतोय ही ओपन जीप राहुल जगताप यांचे असून या ओपन चा 25 हून अधिक हिंदी मराठी चित्रपटात वापर केला गेला असूनआता दबंग थ्री या चित्रपटात सलमान खान सोबत आपणास ओपन जीप पाहावयास मिळणार आहे.