हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Salman Khan Property) बॉलिवूडचा दबंग अभिनेता अर्थात प्रक्षकांचा लाडका भाईजान सलमान खान कायम चर्चेत असतो. दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या सलमान खानचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. जो त्याच्या प्रोफेशनलच नव्हे तर पर्सनल लाईफबाबत जाणून घेण्यातही बराच इंटरेस्टेड असतो. सलमान खान लग्न कधी करणार? हा तर युनिव्हर्सल प्रश्न आहे. ज्याचं उत्तर काही मिळेना. अशातच सलमानचे वडील आणि प्रसिद्ध लेखक सलीम खान यांनी केलेले वक्तव्य चर्चेत आले होते.
सलीम खान यांनी आपल्या मुलाविषयी सांगताना म्हटले की, सलमान कधीच प्रेमात पडला नाही आणि ही त्याची कमजोरी आहे. यात सुधारणा झाली नाही तर सलमान आयुष्यभर अविवाहित राहील. (Salman Khan Property) यानंतर आता सलमान कधीच लग्न करणार नाही, अशी चर्चा सुरु आहे. दरम्यान, सलमान जर लग्न करणार नाही तर त्याने इतकी वर्ष कमावलेली मालमत्ता तो कुणाला देणार? या मालमत्तेचं काय होणार? याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. अशातच याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
भाईजानकडे आहे ‘इतकी’ मालमत्ता (Salman Khan Property)
बॉलिवूड सिनेइंस्ट्रीतील मोस्ट एलिजेबल बॅचलर म्हणून सलमान खानकडे पाहिले जाते. अनेक प्रेमप्रकरणानंतरही सलमानच्या आयुष्यातील एकटेपण काही जात नाही. संगीता बिजलानी, ऐश्वर्या रॉय आणि कॅटरीना कैफ अशा अभिनेत्रींसोबत असलेले त्याच प्रेमसंबंध काही ना काही कारणांमुळे तुटले आणि त्यामुळे सलमान आजही अविवाहित आहे. गेल्या ३ दशकांपासून तो इंडस्ट्रीत कार्यरत आहे. त्यामुळे आतापर्यंत सलमानने ४ हजार कोटींची संपत्ती कमावली आहे. मात्र अविवाहित असल्यामुळे मुलबाळ नसलेला सलमान इतक्या संपत्तीचं करणार काय? असा प्रश्न निर्माण होतो. तर याविषयी अशी माहिती समोर आली आहे की, सलमानची मालमत्ता ही चार हिस्स्यांमध्ये वाटली जाणार आहे.
सलमान खानची गडगंज संपत्ती कोणाला मिळणार?
सलमान खानने गेल्या ३ दशकांपासून कमावलेली गडगंज संपत्ती चार लोकांमध्ये वाटली जाणार असल्याचे समोर आले आहे. अर्थात त्याच्या संपत्तीचे चार हिस्से होणार. जे त्याच्याच कुटुंबातील लोकांमध्ये वाटली जाणार आहे. (Salman Khan Property) सलमान खानची कोट्यवधींची संपत्ती त्याचा भाऊ अरबाज, सोहेल, बहीण अलविरा आणि अर्पिता खान यांच्यात वाटली जाणार आहे.
बिईंग ह्युमनलादेखील देणार वाटा
अभिनेता सलमान खान बिईंग ह्युमन नावाची एक संस्था चालवतो, हे आपण सारेच जाणतो. या NGO च्या माध्यमातून तो गरीब आणि गरजू लोकांना आवश्यक ती मदत पुरवतो औषधोपचार, शस्त्रक्रिया, अन्नपुरवठा यांसारख्या अनेक बाबतीत बिईंग ह्युमन सर्वसामान्यांमा मदत करते. (Salman Khan Property) त्यामुळे सलमान खानच्या संपत्तीतील काहीसा वाटा अर्थात काही पैसा तो त्याच्या एनजीओ बिईंग ह्युमनला देगणी म्हणून देणार असल्याचे सांगितले जात आहे.