Salman khan | ‘बालपणीचे प्रेम आता म्हातारे होत आहे’ सलमान खानचा लेटेस्ट व्हिडिओ पाहून चाहते झाले भावूक

Salman khan

Salman khan | बॉलीवूड अभिनेता सलमान खान (Salman khan) हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असतो. नुकतेच सलमानने त्याचा भाऊ अरबाज खान निर्मित पाटणा शुल्का या चित्रपटाच्या प्रीमियरला हाजेरी लावली होती. या ठिकाणी तो त्याच्या दबंग स्टाईलमध्ये दिसला होता. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भाईजानच्या नवीन स्टाईलने सगळ्यांनाच वेड लावलेले आहेत. त्याचा हा व्हिडिओ पाहून त्याचे अनेक चाहते या व्हिडिओवर कमेंट करत आहेत.

सलमानचा व्हायरल व्हिडिओ

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये सलमान खान 9Salman khan) त्याच्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. त्याचप्रमाणे त्याच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य देखील दिसत आहे. यावेळी सलमानने निळ्या रंगासाठी शर्ट घातलेला होता. त्याचप्रमाणे टोपी देखील घातली होती. त्याचा व्हिडिओ पाहून त्याचे अनेक चाहते कमेंट करत आहे. त्याच्या एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “बालपणीचे प्रेम आता म्हातारे होत आहे” आणखी एका युजरने लिहिलेले आहे की, “सलमान खान हा बॉलीवूडचा जीव आहे.” त्याच्या आणखी एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “तो म्हातारा का होत आहे? तो जगातील सर्वात चांगला दिसणारा हिरो आहे.”

https://www.instagram.com/reel/C5EYadRyooI/?utm_source=ig_embed&utm_campaign=loading

सतीश कौशिक यांची आठवण काढत सलमान झाला भावूक | Salman khan

यासोबतच सलमान खानचा आणखी एक व्हिडिओ समोर आलेला आहे. या व्हिडिओमध्ये सलमान दिवंगत अभिनेते सतीश कौशिक यांच्याबद्दल बोलताना भावूक होताना दिसत आहे. या पाटना शुल्का चित्रपटातील दिवंगत अभिनेता दिसणार आहे. त्यामुळे त्यांची आठवण करून सलमान म्हणाला की, “ते आमच्या खूप जवळचे होते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी काम करत असताना सर्व प्रकल्प पूर्ण केलेले आहे.”

सलमान खानने त्याच्या करिअरची सुरुवात 90 च्या दशकापासून केली होती. आज त्याची गणना बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि हिट नायकांमध्ये केली जाते. वयाच्या 58 व्या वर्षी देखील सलमान खानचा चाहता वर्ग त्याच्यासाठी वेडा झालेला असतो.