हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। बॉलिवूडचा दबंग अभिनेता अर्थात सलमान खान (Salman Khan) हा इंडस्ट्रीतील लोकप्रिय कलाकार आहे. त्याच फॅन फॉलोईंग एकदम जबरदस्त आहे. देशातच नव्हे तर विदेशातही त्याचे चाहते आहेर. जे कायम त्याच्याविषयी जाणून घेण्यात रुची ठेवतात. सलमान खान हा एक उत्तम अभिनेता असला तरीही त्याच्या कामापेक्षा जास्त त्याच खाजगी आयुष्य लाइमलाईटमध्ये असतं. इंडस्ट्रीतील मोस्ट बॅचलर म्हणून त्याची एक खास ओळख आहे. वय वाढतंय पण मुलींमधील सल्लूचं क्रेझ काही कमी होईना. अशातच सलमान खान लग्न कधी करणार? हा तर युनिव्हर्सल प्रश्न झालाय.
दरम्यान सलमान खान काही लग्न करेना!! पण का? याचं उत्तर अद्याप कुणाला मिळालेलं नाही. अशातच सलमान खानचे (Salman Khan) वडील आणि प्रसिद्ध लेखक सलीम खान यांचे एक विधान प्रचंड चर्चेत आले आहे. त्यांनी सलमान खान आयुष्यभर अविवाहित राहणार असे म्हटले आहे. सोबतच त्याचे कारणदेखील सांगितले आहे. चला तर जाणून घेऊया सलीम खान यांनी नेमकं काय वक्तव्य केलंय?
सलमान आयुष्यभर अविवाहित राहणार… (Salman Khan)
अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांनी आपल्या मुलाच्या लग्नाबद्दल मोठे आणि गंभीर वक्तव्य केले आहे. त्यांनी म्हटले की, आज जर सलमान खान अविवाहित आहे तर त्याला दुसरे कोणी नाही तर तो स्वतः याला जबाबदार आहे. यापुढे बोलताना सलीम खान यांनी सलमानच्या कमतरतांबद्दल खुलासा केला आहे. या कमींमुळे त्याचे लग्न झाले नाही आणि होणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
सलमानमध्ये नेमकी काय कमी आहे?
सलीम खान यांनी म्हटले, ‘सलमानमध्ये एक गंभीर कमी आहे. ज्यामुळे आजपर्यंत त्याच लग्न झालं नाही आणि पुढे ही कमी दूर झाली नाही तर कदाचित त्याच लग्न कधीच होणार नाही’. (Salman Khan) यापुढे सलमानच्या कमीबद्दल बोलताना ते म्हणाले की, ‘माझा मुलगा सलमान खान कधीही कोणाच्या प्रेमात पडला नाही आणि म्हणूनच तो अजूनही बॅचलर आहे. जर सलमान कधीही प्रेमात पडला नाही तर तो आयुष्यभर बॅचलर राहील किंवा जोपर्यंत तो ही कमतरता दूर करत नाही तोपर्यंत तो लग्न करणार नाही असे आपण म्हणू शकतो’.
मोस्ट बॅचलर सल्लू
सलमान खान हा बॉलिवूड इंडस्ट्रीतील मोस्ट बॅचलर अभिनेता आहे. ज्याच्यावर फिदा तरुणींची काही कमी नाही. तरीही सलमान काही लग्न करायला तयार नाही. आजपर्यंत त्याच नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. (Salman Khan) पण त्याच कोणतंच नातं कधी वर्क झालं नाही. ऐश्वर्या, कॅटरिना, सोनाक्षी… अशा अनेक सुंदर अभिनेत्रींसोबत नाव जुळूनही सलमानचं शुभमंगल काही झालं नाही. सलमान खानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, तो लवकरच ‘गजनी’ चित्रपटाचे दिग्दर्शक एआर मुरुगदास दिग्दर्शित ‘सिकंदर’ या चित्रपटात दिसणार आहे.