हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोणाचे नशीब कधी पलटेल हे काही सांगता येत नाही. अशीच एक घटना अशोक ठाकूर या व्यक्ती सोबत घडली आहे. सलूनचे दुकान चालवणारे अशोक यांनी आयपीएल मध्ये ड्रीम इलेव्हन या अँप्लिकेशन द्वारे फक्त 50 पन्नास रुपये गुंतवून तब्बल 1 करोड रुपयांचे बक्षीस मिळवले. यानंतर अशोकचा आनंद गगनात मावेनासा झाला.
रविवारी रात्री चेन्नई आणि कोलकाताच्या आयपीएल सामन्यात पन्नास रुपये गुंतवून ड्रीम इलेव्हनमध्ये संघ बनवून त्याने आपले नशीब आजमावले. अशोकने निवडलेल्या सर्व खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी केली आणि अशोक करोडपती झाला. दरम्यान, करोडपती झाल्यानंतर आपण रात्रभर आनंदाने झोपू शकलो नाही असे अशोक यांनी म्हंटल.
मिळालेल्या माहितीनुसार अशोकला 70 लाख रुपये मिळतील अशोकला यासाठी अधिकृत कॉलही आला आहे. त्याला आयपीएलमधून हा संदेश मिळाला आहे. यामध्ये तीस टक्के रक्कम कापल्यानंतर त्याला 70 लाख रुपये मिळतील. ही लॉटरी लागल्यानंतर अशोक ‘आधी कर्ज फेडेल आणि मग घर बांधणार असल्याचे म्हंटले आहे.