भावानेच भावाला बदडले; सॅम करनने भाऊ टॉम करनच्या ओव्हर मध्ये चोपल्या 23 धावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यात टॉम करण आणि सॅम करण हे दोन्ही भाऊ एकमेकांविरोधात उभे होते. सॅम करण हा चेन्नई कडून खेळतो तर टॉम करण दिल्लीच्या संघात आहे. दरम्यान सामन्याच्या 19 व्या ओव्हर मध्ये हे बंधू समोरासमोर आले आणि छोटा भाऊ सॅम करन मोठा भाऊ टॉम करनवर तुटून पडला.

टॉम करनच्या एकाच ओव्हरमध्ये सॅमने तब्बल 23 धावा ठोकल्या. चेन्नईला शेवटच्या ओव्हर्समध्ये धावांची गरज असताना सॅमनने आक्रमक खेळी करुन चेन्नईला योग्य धावसंख्येपर्यंत पोहोचवलं. त्याने टॉमच्या एकाच ओव्हरमध्ये दोन चौकार आणि दोन षटकार लगावले.

दरम्यान सॅम करणच्या खेळीनंतर देखील या सामन्यात चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला. शिखर धवन आणि पृथ्वी शॉ या आक्रमक फलंदाजानी चेन्नईच्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला आणि पहिल्याच सामन्यात दमदार विजय मिळवला.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group