समर्थ रामदास स्वामी, छत्रपती शिवाजी महाराज यांचे भेटीचे शिल्प तोडणार : श्रीमंत कोकाटे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

साताऱ्यातील राजवाडा बसस्थानक येथे समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे भेटीचे शिल्प उभारले आहे. या शिल्पाचे उदघाटन काल सोमवारी दि. 20 रोजी झाले. तेव्हा आमची विनंती आहे, की संबधित खात्यांनी ते बदनामीकारक शिल्प हटवावे. अन्यथा सातारा शहरातील कायदा, सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे. सदरील शिल्प न हटविल्यास शिवप्रेमी ते शिल्प तोडल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा श्रीमंत कोकाटे यांनी दिला आहे.

सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्रीमंत कोकाटे बोलत होते. ते पुढे म्हणाले, या शिल्पाचे उदघाटन सोमवारी दि. 20 रोजी  काही लोकांनी विघ्यसंतोषी, समाजकटकांनी केले. या शिल्पाचे उदघाटन होणार आहे, हे माहिती असूनही पोलिस विभागाने पुरेसा बंदोबस्त दिलेला नाही. तेव्हा या शिल्पास संबधित खात्याची मूकसमंती आहे का शिवाजी महाराजांचा अवमान करण्यासाठी असा संशय येतोय. स्वामी समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू मार्गदर्शन नव्हते हे इतिहास अभ्यासकांनी समकालीन संदर्भाच्या आधारे सिद्ध केलं असताना देखील सातारा बसस्थानक परिसरात शिल्प उभारण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर प्रश्न होऊ नये यासाठी शासनाने हे वादग्रस्त शिल्प काढावे.

मार्गदर्शक, शिक्षक नव्हता, तरीही रामदास शिवाजी महाराजांना मार्गदर्शन करतो अशा पध्दतीचे शिल्प उभारलेले आहे. ते अनऐतिहासिक, अनाधिकृत असून शिवाजी महाराजांची बदनामी करणारे आहे. ते शिल्प काढावे यासाठी अनेक परिवर्तनवादी संघटना, अभ्यासकांनी डिसेंबर 2020 ला जिल्हाधिकारी, एसटी महामंडळ, बांधकाम विभाग आणि नगरपालिका यांना निवेदन दिले होते. निवेदन देवून एक वर्ष झाले तरी संबधित शिल्प हटविले नाही.

शिल्पाचे उदघाटन करणाऱ्या 11 लोक पोलिसांच्या ताब्यात

समर्थ रामदास स्वामी आणि छ. शिवाजी महाराज यांचे भेटीच्या शिल्पाचे काही लोक उदघाटन करत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर घटनास्थळी पोलिस दाखल झालेले आहे. उदघाटन हे बेकायदेशीर होते. एसटी प्रशासनाची तक्रार घेवून कारवाई केली जाईल. भेटीच्या शिल्पावरून वाद आहे, त्या संदर्भात एसटी प्रशासनाने कला संचालनालय यांच्याकडे परवानगी मागितलेली आहे.  सातारा येथील राजवाडा बसस्थानक परिसरात काल रात्री अनाधिकृतपणे उदघाटन करणाऱ्या 11 लोकांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी दिली आहे.

राजवाडा बसस्थानकात पोलिस फाैजफाटा

राजवाडा बस स्थानकात शिवप्रेमींनीसह मिलिंद एकबोटे आणि भाजप नगरसेवक विजय काटवटे यांच्यासह शेकडो शिवप्रेमी उदघाटन प्रसंगी होते. या शिल्पास शहरातील काही संघटनांचा विरोध होता. त्यामुळे त्याचे उदघाटन 2 ते 3 वर्षांपासून लांबणीवर पडले होते. राजवाडा बसस्थानक परिसरात हे शिल्प उभारले गेले असल्याने एसटी महामंडळाने या कार्यक्रमास मनाई केली होती. आज सायंकाळच्या सुमारास अचानक शिवप्रेमी एकत्र येत त्यांनी राजवाडा बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिल्पकृतीचे उदघाटन केले. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस अधीक्षक आंचल दलाल या 20 ते 25 पोलिस कर्मचारी यांच्यासह बसस्थानक येथे पोचल्या. त्यांनी शिवप्रेमींची धरपकड करत ताब्यात घेतले. यावेळी 10 ते 12 चार चाकी आणि 25 दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या. राजवाडा परिसरात तणाव निर्माण झाला असून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Leave a Comment