दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; पहा कोणत्या तारखेला आहे परीक्षा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच दहावी आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या असून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना संपूर्ण वेळापत्रक हे बोर्डाच्या www.mahahsscboard.in याअधिकृत वेबसाईटवर पहायला मिळेल.

बोर्डाकडून यापूर्वी परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यानुसार 12वीची लेखी परीक्षा 4 मार्च 2020 ते 7 एप्रिल 2022 या दरम्यान होणार आहे. तर दहावी बोर्डाची परीक्षा 15 मार्च 2022 ते 18 एप्रिल 2022 या कालावधीत घेण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. दोन्ही परीक्षा प्रत्यक्ष केंद्रावरच म्हणजेच, ऑफलाइन पद्धतीने होणार आहेत.

राज्यातील शाळा/कनिष्ठ महाविद्यालये ऑक्टोबर २०२१ पासून विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीसह सुरू झाली आहेत. त्याअनुषंगाने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) साठी शालेय शिक्षण विभागामार्फत प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन तसेच लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर परीक्षा कालावधीमध्ये मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे.