राज ठाकरे हिंदू- मुस्लीम दंगली घडवण्याचं काम करतायत; कोणी केला आरोप?

Raj Thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे हिंदू आणि मुस्लीम दंगली घडवण्याचं काम करत आहेत, असा गंभीर आरोप संभाजी ब्रिगेडचे मनोज आखरे यांनी केला आहे. तसेच जिथं जिथं खोटा इतिहास सांगितला गेला,तिथं राज ठाकरेंनी समर्थन दिलं आहे, असंही त्यांनी म्हंटल. पुणे येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मनोज आखरे म्हणाले, राज ठाकरेंनी RSS ची सुपारी घेऊन ‘हर हर महादेव’ चित्रपट बाहेर आणला आणि महाराष्ट्र अशांत करण्याचे काम केले. काही लोक न घडलेला इतिहास दाखवायचा प्रयत्न करत आहेत. जेव्हा जेव्हा विश्वासू सरदारांची बदनामी करण्याचे काम केले जाते आणि खोटा इतिहास दाखवला जातो तेव्हा फक्त राज ठाकरे समर्थन करतात. खोटा इतिहास दाखवणाऱ्या लोकांच्या पाठीशी राज ठाकरे का उभे राहतात? असा सवाल त्यांनी केला.

दरम्यान, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते असं वादग्रस्त विधान केलं होत. त्यावरही बोलताना मनोज आखरे यांनी हल्लाबोल केला. शिवाजी महाराजांची बदनामी कदापी सहन केली जाणार नाही. राज्यपाल कोश्यारी अश्या जर विकृत भाषेत विधान करत असतील तर त्यांना महाराष्ट्रात राहायचा अधिकार नाही त्यांनी महाराष्ट्रात राहता कामा नये अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला.