राज ठाकरेंना अटक करा; संभाजी ब्रिगेडची मागणी

raj thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्राला खोटा इतिहास सांगून राज्यातील वातावरण बिघडवत आहेत असा आरोप करत राज ठाकरेंना अटक करा अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केली आहे

महात्मा फुले यांनी शिवाजी महाराज यांच्या समाधी शोधली आणि पोवाडा लिहिला. लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी जीर्णोद्धारासाठी पैसे जमा केले, पण जीर्णोद्धार केला नाही. इंदौरचे होळकर आणि ब्रिटिशांनी १९१७ मध्ये समाधीचा जीर्णोद्धार केला,” असं मत प्रविण गायकवाड यांनी व्यक्त केलं.

जेम्स लेनने शिवाजी महाराजांच्या पितृत्वावरून जो मजकूर लिहिला त्यावरून वाद झाला. तशाच प्रकारचं लिखाण बाबासाहेब पुरंदरेंनी त्यांच्या राजा शिवछत्रपती या पुस्तकात केलं आहे. शहाजीराजे अनुपस्थित होते. तसेच दादाजी कोंडदेव यांना पुरंदरेंनी आपल्या कादंबरीमध्ये सह्याद्री म्हटलंय, असा आरोप प्रवीण गायकवाड यांनी केला

शरद पवार साहेबांना जातीयवादी बोलणे चुकीचे आहे. पवार साहेबांचे धोरण सर्वसमावेशक आहे राज ठाकरेंची स्क्रिप्ट कोण लिहितात. शाहू फुले नाव घेणारे बहुजनवादी आहेत तर हिंदू-मुस्लिम करणारे जातीयवादी आहेत. पुण्यात आम्ही दोन वेळा जाहीर व्याख्यान ठेवले आणि पुरंदरे यांना इतिहास चर्चेला बोलवलं होते पण ते चर्चेला आले नाही. असेही प्रवीण गायकवाड यांनी म्हंटल