हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी जोरदार पुढाकार घेतला असून समाजाची भावना जाणून घेण्यासाठी ते सध्या राज्यभर दौरा करत आहेत. यादरम्यान त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे सुद्धा उपस्थित होते. संभाजीराजे यांची मुख्यमंत्र्यांसोबत जवळपसा 45 मिनिटे बैठक झाली.
यावेळी संभाजीराजे म्हणाले की मुख्यमंत्री आणि उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना भेटलो. यादरम्यान कायदेशीर चर्चा झाली. मराठा समाजालाआरक्षण कसं मिळेल यावर चर्चा झाली. आरक्षण मिळवण्यासाठी अडचणी आहेत पण मार्ग काढता येईल. असे यावेळी संभाजीराजे यांनी म्हंटल
दुसरी गोष्ट दुसरे सर्व पक्ष एकत्र कसे येतील यावर चर्चा झाली. याशिवाय शिवराज्याभिषेक सोहळ्याबाबतही चर्चा झाली. मला वाटतंय ज्या आशेने मी आलोय, त्या दिशेने सर्व सुरु आहे. मी पाच वाजताच्या पत्रकार परिषदेत अधिक भूमिका मांडेन”, असं छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितलं.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.