Thursday, March 30, 2023

मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजे घेणार राज ठाकरेंची भेट

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला असून त्याच पार्श्वभूमीवर खासदार छत्रपती संभाजीराजे संपूर्ण महाराष्ट्रात फिरून मराठा समाजाची भावना जाणून घेत आहेत. तसेच राजकीय नेत्यांच्या गाठी घेऊन मराठा समाजाला आरक्षण कसे मिळेल यासाठी प्रयत्न करत आहेत. आज सकाळीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आता ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला जाणार आहेत.

दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास संभाजीराजे  राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी दाखल होतील, असे सांगितले जात आहे. मराठा आरक्षणावर राज ठाकरे यांची नेमकी काय भूमिका आहे, हे जाणून घ्यायचा संभाजीराजे यांचा प्रयत्न आहे. त्यासाठीच संभाजीराजे राज ठाकरे यांना भेटणार असल्याचे समजते.

- Advertisement -

पवार – संभाजीराजे भेटीत नक्की काय घडलं-

आज सकाळीच संभाजी राजे यांनी शरद पवारांची भेट घेतली. तेव्हा मराठा समाज किती अस्वस्थ आणि दु:खी आहे, हे त्यांनी पवारांच्या कानावर घातले. त्यामुळे आता मराठा आरक्षणासाठी तुम्ही पुढाकार घेणे गरजेचे आहे. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नारायण राणे या सगळ्या नेत्यांनीही एकत्र आले पाहिजे. असेही संभाजी राजे म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.