हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेतर्फे संजय राऊत आणि कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान पवार यांच्यापूर्वी छत्रपती संभाजीराजे यांना शिवसेनेने पक्ष प्रवेशाची अट घालत उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, छत्रपती संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिल्यानंतर आता त्यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून “महाराज… तुमच्या नजरेतलं स्वराज्य मला घडवायचंय… मी कटीबद्ध असेन तो तुमच्या विचारांशी… मी बांधील असेन तो फक्त जनतेशी…, अशी एक पोस्ट शेअर केली आहे.
https://www.facebook.com/photo.php?fbid=548086290021863&set=a.527880985375727&type=3
शिवसेनेकडून संभाजीराजेंची उमेदवारी डावलल्यानंतर त्यांनी फेसबुक पोस्ट करत आपली भावना व्यक्त केली आहे. संभाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महारांना वाकून नमस्कार करताना स्वत:चा एक फोटो भावनिक मजकुरासहीत पोस्ट केला आहे. तसेच त्या माध्यमातून त्यांनी आपल्या मनातील भावना बोलून दाखवली आहे.
राज्यसभेच्या दुसऱ्या जागेकरिता शिवसेनेने कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांना उमेदवारी देण्याची तयारी दर्शविली होती. फक्त त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा व पक्षाचे अधिकृत उमदेवार म्हणून रिंगणात उतरावे ही अट संभाजीराजे यांना घालण्यात आली आहे. अपक्ष म्हणून महाविकास आघाडीने पाठिंबा द्यावा, अशी संभाजीराजे यांनी भूमिका आहे. आता संभाजीराजेंकडून आज एक फेसबुक पोस्ट करत आपल्याला महाराजांच्या नजरेतलं स्वराज्य मला घडवायचंय आहे, असे म्हंटले आहे.