व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

काही नेते अगोदरच ED च्या कारवाईबाबत सांगतात, त्यांच्यावर… ; परबांवरील कारवाई प्रकरणी अजित पवारांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनी लॉडिंग प्रकरणी शिवसेना नेते अनिल परब यांच्या वांद्रेतील घरावर ईडीने आज सकाळी धाड टाकत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली असून त्यांनी परब यांच्यावरील कारवाईवरून भाजप , केंद्र सरकार व किरीट सोमय्यांवर निशाणा साधला आहे. “केंद्रीय तपास यंत्रणांना आणि राज्यांच्या यंत्रणांना चौकशी करायचा अधिकार आहे. मात्र काही भाजप नेते जे बोलतात तेच घडत आहे. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई न होता त्यांनी माहिती दिलेल्या महा विकास आघाडीतील नेत्यावर कारवाई होते, असे पवार यांनी म्हंटले आहे.

अजित पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, केंद्र सरकारकडून व भाजपकडून ईडीच्या साह्याने कारवाया केल्या जात आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांना तपास करण्याचा अधिकार आहे मात्र तो पारदर्शकपणे आहे. त्यामध्ये कोणीही राजकारण करणे गरजेचे नाही. अशाप्रकारे कोणाचाही ईडीच्या कारवाईमध्ये हस्तक्षेप नसावा. मात्र, काहीजण आधीच टीम कुठे जाणार हे सांगतात. केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर होऊ नये हीच माफक अपेक्षा आहे.

अनिल परबांवर कोणत्या प्रकरणी कारवाई?

यावेळी अजित पवार यांनी ईडीकडून आज करण्यात आलेल्या कारवाईबाबत शंका उपस्थित केली. अनिल परबांवर कोणत्या प्रकरणी कारवाई सुरू आहे, माहित नाही. राजकीय सुडपोटी कारवाई नको. यंत्रणांच्या कामात पारदर्शीपणा पाहिजे. माझ्याही नातेवाईकांवर केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशीची कारवाई केली होती. तपास पारदर्शी होत असेल, तर कुणाची ना नाही. यापूर्वी देखील ईडी, सीबीआयकडून कारवाई झाली, माझं म्हणण आहे कोणाचाही हस्तक्षेप न होता चौकशी व्हायला हवी. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर देखील कारवाई होते, मात्र ही कारवाई पारदर्शक पद्तीने कारवाई व्हायला हवी, अशी मागणी पवार यांनी केली आहे.