Sambhajiraje Chhatrapati : छत्रपती संभाजीराजे 5 दिवसांपासून नॉट रिचेबल; चर्चाना उधाण

Sambhajiraje Chhatrapati Not Reachable
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Sambhajiraje Chhatrapati : कोल्हापुरचे संभाजीराजे छत्रपती गेल्या पाच दिवसांपासून नॉट रिचेबल असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे कुटुंब आणि कार्यकर्त्यांशीही देखील संभाजीराजेंचा संपर्क होत नसल्याचं समजतंय. त्यामुळे विविध चर्चांना सुरुवात झाली आहे. संभाजीराजे नेमके गेले कुठे हा प्रश्न आता कार्यकर्त्यांच्या मनात पडला आहे. कोल्हापूर लोकसभा मदारसंघात शाहू छत्रपती की संभाजीराजे छत्रपती यांच्या उमेदवारीवरून चर्चा सुरू असतानाच संभाजीराजे नॉट रिचेबल झाले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात सुद्धा खळबळ उडाली आहे.

संभाजीराजे गेले तरी कुठे?? Sambhajiraje Chhatrapati

यापूर्वी तीन फेब्रुवारीला संभाजीराजे यांच्या हस्ते कोल्हापुरातील विकासकामांचं उद्घाटन होणार होतं. मात्र त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच दोन फेब्रुवारीला संभाजीराजे छत्रपती यांनी एक ट्विट करत काही कारणास्तव उद्यापासूनचे सर्व नियोजित कार्यक्रम व दौरे रद्द करण्यात आलेले आहेत असं म्हंटल आणि त्यानंतर संभाजीराजे छत्रपती नॉट रिचेबल आहेत. येत्या 11 फेब्रुवारीला संभाजीराजेंचा वाढदिवस (Sambhajiraje Chhatrapati) असून कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी सुरु आहे. आता त्यादिवशी तरी संभाजीराजे सर्वासमोर येतील का हे पाहावं लागेल.

कोल्हापूर लोकसभेसाठी उमेदवार कोण??

दरम्यान, कोल्हापूर लोकसभा (Kolhapur Lok Sabha) मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून संभाजीराजे यांचे वडील शाहू महाराज छत्रपती यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे संभाजीराजे सुद्धा या निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे बोललं जात आहे. मात्र त्यांच्या स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून ते निवडणूक लढवण्याची शक्यता असून स्वराज्य हीच आपली आगामी वाटचाल असेल असं संभाजीराजेनी यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. मात्र आता अचानक संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapati) नॉट रिचेबल झाल्याने खळबळ उडाली आहे. संभाजीराजे नेमकं कुठे आहेत?? ते कधी सर्वांसमोर येणार याकडे सर्वांचं लक्ष्य लागलं आहे. त्यानंतरच त्यांच्या नॉट रिचेबल होण्याचं कारण सुद्धा समोर येईल.