हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी खोट्या कागदपत्राच्या आधारावर नोकरी मिळवली असून ते मुस्लिम आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. त्यानंतर समीर खान यांच्या वडिलांनी हा दावा खोडून काढला होता. मात्र ज्या मौलाना मुज्जमील अहमद यांनी समीर यांचे पाहिले लग्न लावले, त्यांनी मात्र समीर वानखेडे मुस्लीम च आहेत असा गौप्यस्फोट केला आहे.
समीर वानखेडे हे मुस्लीम होते म्हणूनच त्यांचा निकाह करण्यात आला असे मौलाना मुज्जमील अहमद यांनी म्हंटल आहे. तसेच समीर यांची आई आणि वडील हे पण मुस्लीमच होते, सर्व मुस्लीम असल्यावरच निकाह होतो असेही त्यांनी म्हंटल. तसेच जेव्हा निकाह लावला तेव्हा समीर यांच्या वडिलांचे नाव हे दाऊद हेच होते असेही त्यांनी सांगितले.
मलिकांकडून समीर यांच्या पहिल्या लग्नाचा फोटो शेअर –
तत्पूर्वी, नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा फोटो शेअर केला. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे आणि शबाना कुरेशी यांच्या लग्नाचे सर्टिफिकेट ट्विटर वर शेअर केले आहे. तसेच या लग्नावेळी साक्षीदार म्हणून समीर वानखेडे यांची बहीण यास्मिन यांचे पती अजीज खान हे होते असा दावाही त्यांनी केला आहे. यापूर्वी नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या जन्माचे प्रमाणपत्र ट्विटर शेअर केलं होतं.