Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! रासपच्या जिल्हाध्यक्षांसह 2 ठार

Samruddhi Mahamarg Accident
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Samruddhi Mahamarg Accident : महाराष्ट्र्रातील समृद्धी महामार्गावर सतत अपघाताच्या घटना आपण बघतोय. अपघातांची मालिका अजूनही सुरूच असून शुक्रवारी आणखी एक भीषण अपघात झाला. समृद्धी महामार्गावरील छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल-सावंगी परिसरात ट्र्क आणि कार मध्ये अपघात झाला. यामध्ये २ ठार तर २ जखमी झाला. मृतांमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे भंडारा जिल्हाध्यक्ष स्वरूप रामटेके यांचाही समावेश आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, हर्सूल-सावंगी परिसरात उभ्या असलेल्या ट्रकवर भरधाव वेगाने येणारी स्विफ्ट डिझायर गाडी आदळली. आणि आहे भीषण अपघात (Samruddhi Mahamarg Accident) झाला. यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ उपाध्यक्ष तसेच भंडारा जिल्हाध्यक्ष स्वरूप रामटेके (35) यांच्यासह संदीप साखरवाडे (40) यांचा मृत्यू झाला. तर, रितेश भानादकर (24) आणि आशिष सरवदे (37) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे.

समृद्धी महामार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा – (Samruddhi Mahamarg Accident)

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे चौघेही मुंबईला रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना भेटण्याकरिता गेले होते. तिथून परतत असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला. समृद्धी महामार्ग हा मुंबई आणि विदर्भाला जोडण्यासाठी तयार करण्यात आला. परतू जेव्हापासून या महामार्गाचे उदघाटन झालं तेव्हापासून या ठिकाणी दररोज छोटे मोठे अपघाताच्या घटना घडत आहेत. समृद्धी महामार्ग आता मृत्यूचा मार्ग झाला आहे. प्रशासनाने अनेक उपाय योजना करून देखील या मार्गावरचे अपघात कमी झालेले नाहीत.