हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| तुम्ही जर समृद्धी महामार्गावरून (Samruddhi Mahamarg) छत्रपती संभाजीनगर ते जालना असा प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण, हा मार्ग 2 टप्प्यात पाच दिवसांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. जालना ते छत्रपती संभाजीनगर अशा दोन बाजूंची वाहतूक येत्या 10 ऑक्टोंबर ते 12 ऑक्टोंबर दुपारी 12 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यात 25 ऑक्टोंबर ते 26 ऑक्टोंबर कालावधीत दुपारी 12 ते 3 दरम्यान या मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे. त्यामुळे प्रवाश्यांना पर्यायी वाहतुक मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे. याबाबतची माहिती प्रकल्प संचालक रामदास खलसे यांनी दिली आहे.
छत्रपती संभाजीनगर ते जालना या मार्गावरील वाहतूक पाच दिवस बंद राहणार आहे. यासंदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) पॉवर ग्रिड ट्रान्समीशन अती उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम करण्यात येणार आहे. हे काम दोन टप्प्यात करण्यात येईल. या कामाचा पहिला टप्पा 10 ते 12 ऑक्टोंबर रोजी पूर्ण होईल. त्यामुळे मंगळवार, बुधवार, गुरुवार असे तीन दिवस वाहतूक मार्ग बंद राहणार आहे. त्याचबरोबर या कामाचा दुसरा टप्पा 25 व 26 ऑक्टोंबर रोजी पूर्ण केला जाईल. ज्यामुळे बुधवार, गुरुवार असे दोन दिवस पुन्हा वाहतूक मार्ग बंद ठेवण्यात येईल. मात्र इतर कालावधीमध्ये समृद्धी महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहणार आहे.
पर्यायी वाहतूक मार्ग- Samruddhi Mahamarg
जालना ते छत्रपती संभाजीनगर अशा दोन्ही बाजूंची वाहतूक येत्या 10 ते 12 ऑक्टोबरला दुपारी 12 ते वाजेपर्यंत बंद राहणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ही वाहतूक 25 ते 26 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते दुपारी 3 पर्यंत बंद राहील. या काळात प्रवाशांनी देण्यात आलेल्या पर्यायी वाहतूक मार्गाचा अवलंब करावा. पर्यायी वाहतूक मार्गाची माहिती खाली सविस्तररित्या देण्यात आली आहे.
समृद्धी महामार्गावरील जालना इंटरचेंज (IC-14) ते सावंगी इंटरचेंज (IC-16) मार्गे समृद्धी महामार्गवरुन नागपूर बाजूने मुंबईकडे जाणारी वाहतूक ही निधोना इंटरचेंज IC-14 मधून बाहेर पडून निधोना MIDC मार्गे- राष्ट्रीय महामार्ग 753 A (जालना-छत्रपती संभाजीनगर) मार्गे केंब्रीज शाळेपर्यंत जाऊन नंतर ती उजवीकडे वळून सावंगी बायपास मार्गे सावंगी इंटरचेंज क्र. IC-16 (छत्रपती संभाजीनगर) येथून समृद्धी महामार्गावर प्रवेश करुन शिर्डीच्या दिशेने वळेल.
त्याचबरोबर, महामार्गावरून शिर्डीकडून नागपूरकडे जाणारी वाहतूक ही सावंगी इंटरचेंज क्र. IC-16 (छत्रपती संभाजीनगर) येथून बाहेर पडेल. तेथून वर नमूद केलेल्या मार्गावरुन (विरुद्ध दिशेने) निधोना (जालना) इंटरचेंज क्र. IC-14 या ठिकाणी समृद्धी महामार्गावर प्रवेश करुन नागपूरकडे रवाना होईल. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर ते जालना असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी याच मार्गाने पुढे जावे. त्याचबरोबर पुढील पाच दिवस वाहतूक मार्ग बंद राहणार आहे ही बाब देखील लक्षात घ्यावी.