हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गावर आतापर्यंत अनेक अपघात झाले. अनेकांनी या अपघातात आपले कुटुंबही गमावले. त्यामुळे सरकार यावर्ती उपाययोजना करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहत आहे. त्यातच आता महामार्गांवर वेगवान गाड्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महामार्ग पोलिसांना 15 इंटरसेप्टर वाहने मिळाली आहेत.
एकनाथ शिंदेंनी दाखवला हिरवा झेंडा
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने महामार्ग पोलिसांसाठी 15 स्कॉर्पिओ SUV कार्यान्वित केल्या आहेत. मार्गावर गाड्यांचा स्पीड वाढवणारे तसेच वाहनाचे नियम तोडणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी या गाड्या देण्यात आल्या आहेत. याबाबत सोमवारी जामका, ठाणे या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे.
कश्या आहेत या गाड्या?
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा कडून मिळालेल्या या गाड्या पब्लिक ऍड्रेस सिस्टीम, फर्स्ट एड किट आणि अग्निशामक यंत्रांसह लाल, पांढरा आणि निळा तसेच चमकणाऱ्या लाईट बारने सुसज्ज असलेली ही वाहने महामार्ग पोलिस ठाण्यांसाठी अतिरिक्त पोलिस महासंचालक (वाहतूक) यांच्या कार्यालयाकडे सोपवण्यात आल्या आहेत. त्यामुळे पोलिसांना नियम तोडणाऱ्या लोकांना आळा घालता येणार आहे. त्यामुळे याचा फायदा होईल अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
नागपूर ते इगतपुरीजवळील भरवीर दरम्यानचा रस्ता खुला करण्यात आला
महामार्गावरील नियमाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाय योजना सुरु आहेत. तर दुसरीकडे नागपूर ते इगतपुरीजवळील भरवीर दरम्यानचा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे येथील वाहतूक सुविधेत वृद्धी होऊन लोकांना याचा फायदा होणार आहे.