Samruddhi Mahamarg | समृद्धी महामार्गावरील अपघातांची संख्या घटली; 2024 मधील आकडेवारी समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Samruddhi Mahamarg | महाराष्ट्रमध्ये अनेक नवनवीन प्रकल्प झालेले आहे. त्यातीलच एक सगळ्यात मोठा प्रकल्प हा समृद्धी महामार्ग समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) आहे. हा नागपूर ते मुंबईला जोडणारा एक सगळ्यात मोठा महामार्ग आहे. 2022 मध्ये या महामार्गाचे पहिल्या टप्प्याचे लोकांनी लोकार्पण देखील करण्यात आले होते. परंतु त्यानंतर हा समृद्धी महामार्ग अपघाताचा मार्ग म्हणून ओळखला जाऊ लागला. कारण या समृद्धी महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात झालेले आहेत. परंतु गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत आता या समृद्धी महामार्गावरील अपघाताचे प्रमाण कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षभरात 19 टक्के अपघाताची संख्या कमी झालेली आहे. यामध्ये 33% जीवित हानी देखील कमी झालेली आहे आणि जखमींची संख्या देखील कमी झालेली आहे.

हा समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) चालू झाल्यानंतर वर्षभरातच या महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात घडू लागले. त्यानंतर अनेक पूजा पाठ देखील करण्यात आले. परंतु 2023 पेक्षा 2024 मध्ये अपघाताची संख्या खूप कमी झालेली आहे. या महामार्गावर वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या आणि त्यानंतर या अपघाताचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत आहे.

या समृद्धी महामार्गावर गेल्या वर्षभरात 134 अपघात झालेले आहे. ज्यामध्ये 151 जणांचा बळी गेलेला आहे. यामध्ये 81 हे अपघात हे गंभीर स्वरूपाचे होते, तर 42 गंभीर जखमी झाले होते. यामध्ये 55 लोक किरकोळ जखमी झाले होते. तसेच कोणतीही जखम न झालेल्या अपघातांची संख्या 14 होती.

समृद्धी महामार्गावर जानेवारी ते ऑगस्ट 2023 मध्ये 8 महिन्यात 103 अपघात झाले होते. यामध्ये 120 जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये 63 गंभीर अपघात होते. 30 लोक यामध्ये जखमी झालेले होते, तर 40 लोक किरकोळ जखमी झालेले होते. तसेच कुणीही जखमी न झालेल्या अपघातांची संख्या 8 होती.

त्याचप्रमाणे जानेवारी ते ऑगस्ट 2024 या 8 महिन्याच्या कालावधीत समृद्धी महामार्गावर 83 अपघात झाले. त्यात 80 जणांचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये 57 हे गंभीर अपघात होते 39 लोक गंभीर जखमी झालेले होते. यामध्ये 17 लोक किरकोळ जखमी झालेले होते, तर काहीही जखम न झालेल्या अपघातांची संख्या तीन होती.

ही आकडेवारी लक्षात घेतली तर समृद्धी महामार्गावरील अपघातातील मृत्यूचे प्रमाण हे 33 टक्क्यांनी कमी झालेले आहे. तर गंभीरित्या जखमी होणाऱ्यांची संख्या 30 टक्क्यांनी घटलेली आहे. किरकोळ जखम होणाऱ्यांची संख्या ही 58 टक्क्यांनी कमी झालेली आहे.